Google Life Coach: गुगल आर्टिफिशयल इंटिलिजन्स लवकरच देणार आर्थिक सल्ला, चाचणी सुरु | पुढारी

Google Life Coach: गुगल आर्टिफिशयल इंटिलिजन्स लवकरच देणार आर्थिक सल्ला, चाचणी सुरु

पुढारी ऑनलाईन : गुगल जवळजवळ सर्व सेवांमध्ये मोठ्या AI अपग्रेडवर काम करत आहे. आता नवीन AI वर चालणारे लाईफ कोच सादर करण्याची योजना आखत आहे. द न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, अंडर-डेव्हलपमेंट टूल 21 विविध प्रकारची वैयक्तिक आणि व्यावसायिक कामे करू शकते, ज्यामध्ये जीवन सल्ला, आयडियाज, जेवणाचे नियोजन, आर्थिक नियोजन आणि बरेच काही समाविष्ट आहे. गुगल हे सॅन फ्रान्सिस्को स्थित आणि स्पॉट लाइटमध्ये असणाऱ्या ओपनएआयच्या चॅट जीपीटीप्रमाणे प्रसिद्धी मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. चॅट जीपीटीने आधीच बरेच लक्ष वेधले आहे.

नेमकं काय आहे Google Life Coach

एप्रिलमध्ये गुगलने लंडनमध्ये विकत घेतलेल्या डीपमाइंड इन-हाऊस एआय संशोधन प्रयोगशाळेत त्यांच्या लाइफ कोचची चाचणी सुरू केली आहे. यासाठी सर्च जायंट स्केल एआय बरोबर देखील सहयोग करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाइफ कोच चॅट जीपीटी आणिबार्ड सारखेच असेल. यामध्ये एक AI चॅटबॉट असेल जो प्रश्नांची उत्तरे देईल. लाईफ कोच हे 21 गोष्टींशी संबंधित असून वापरकर्त्यांना त्याच्याकडून सखोल प्रतिसाद मिळेल.

गुगल बार्ड हे लाईफ कोचसारख्या सेवा देते, परंतु त्याला काही मर्यादा आहेत. त्याचा चॅटबॉट आर्थिक, आरोग्य आणि कायदेशीर सल्ल्याबद्दल सल्ला देणे टाळते. सध्या गुगल हे असे करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करत असल्याचे दिसते. न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे आणि डीपमाइंडच्या प्रवक्त्यानुसार गुगलने देशभरातील संशोधन आणि उत्पादनांचे मूल्यांकन करण्यासाठी अनेक भागीदारांसोबत सहयोग करत आहे. पुनरावलोकन डेटाचे वेगळे नमुने आमच्या उत्पादन रोडमॅपचे सूचक नाहीत, असे या प्रवक्त्यांनी सांगितले.

गुगल बार्ड आणि चॅटजीपीटी प्रमाणेच ‘सुपरचार्ज्ड एआय असिस्टंट’ विकसित करत आहे. आगामी काळात एआय लाइफ कोचचा बार्ड एआयमध्ये समावेश केला जाईल की नाही हे अनिश्चित आहे. तथापि, असे दिसते की गुगल एआयवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे, कारण ते नवीन एआय टूल्स विकसित करत आहे, ज्यामध्ये पत्रकारांना बातम्यांचे लेख तयार करण्यात मदत होईल.

हेही वाचा

हिंगोली : डोंगरकडा येथे गोठयाला आग; गाईचा जागीच मूत्यु तर वासरू सुखरुप

Gadar 2 Collection : सनी देओलचा धुमाकूळ, गदर २ ची ६ व्या दिवशीही गती कायम

वेल्हे : पानशेतमधून विसर्ग सुरू

Back to top button