Google workers : नोकरकपातीविरोधात Google कर्मचाऱ्यांची अमेरिकेत निदर्शने

Google workers
Google workers

पुढारी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतील अनेक कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरू आहे. अनेक कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. तसेच अनेकांच्या पगारातही कपात करण्यात आली आहे. कामगारांच्या या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी आणि कंत्राटी कामगारांना आधार देण्यासाठी अमेरिकेतील दोन्ही किनारपट्टीवर कर्मचाऱ्यांनी (Google workers) निदर्शने सुरू केली आहेत.

कर्मचाऱ्यांकडून (Google workers)  पहिल्यांदा बुधवारी (दि.०३) गुगलच्या माउंटन व्ह्यू येथील मुख्यालयावर रॅली काढण्यात आली. तसेच सलग दुसऱ्या दिवशी न्यूयॉर्कमधील गुगलच्या कॉर्पोरेट ऑफिसजवळ गुरुवारी (दि.०३) कर्मचाऱ्यांकडून निदर्शने करण्यात आली. Google ने 12 हजार कर्मचारी कपात केली आहे. पुन्हा एकूण ६ टक्के नोकरकपातीची घोषणा केल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसत आहे.

Google सह (Google workers) इतर महत्त्वाच्या मायक्रोसॉफ्ट, सेल्सफोर्स, अमेझॉन यांसारख्या टेक कंपन्यांंनी नोकरकपातीची घोषणाही केल्याने अमेरिकेत मंदीचे सावट आणखी गडद झाले आहे. यामुळे येथील टेक कंपनीतील नोकरवर्गात असंतोष निर्माण झाला आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news