कर्ज वसुलीसाठी ग्राहकांचा छळ, महाराष्‍ट्र सायबर सेलची गुगुलला नोटीस

Cyber attack
Cyber attack

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कर्ज वसुलीसाठी छळ करणार्‍या लोन (कर्ज) ॲपसंदर्भात कोरोना महामाराीनंतर आतापर्यंत १९०० तक्रारी दाखल झाल्‍या आहेत. याची गंभीर दखल महाराष्‍ट्र सायबल सेल विभागाने घेतली असून, ६९ लोन ॲप काढून टाकावेत, अशी नोटीस महाराष्‍ट्र सायबर सेलने गुगलच्‍या अमेरिकेतील कार्यालयास बाजवली आहे.

यासंदर्भात माहिती देताना महाराष्‍ट्र सायबर सेलचे पोलिस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी सांगितले की, लोन (कर्ज) ॲपसंदर्भातील १९०० तक्रारीपैकी १ १३० प्रकरणाचा तपास सुरु आहेत. यातील ३७६ तक्रारी या लोन ॲपच्‍या माध्‍यामातून नागरिकांच्‍या होणार्‍या आर्थिक व मानसिक छळासंदर्भात आहेत. लोन ॲच्‍या माध्‍यमातून कर्जदाराकडून अधिक व्‍याज आकारले जात आहे. तसेच त्‍यांचे व्‍यक्‍तिगत फोटोचा वापर करुन त्‍यांना ब्‍लॅकमेलही केले जात आहे. यामध्‍ये अधिक तक्रारदार या महिला असल्‍याचेही शिंत्रे यांनी सांगितले.

कर्ज वसुलीसाठी छळ : ग्राहकांच्‍या गौपनीय माहितीचा गैरवापर

लॉन ॲपच्‍या माध्‍यमातून ग्राहकांच्‍या आंतरराष्‍ट्रीय नंबरर्स वरुन फोन येतात. ग्राहकांच्‍या फोन, ई-मेल आणि आधार कार्ड अशा गौपनीय माहितीचाही गैरवापर केला जात आहे. तसेच ग्राहकांकडून अधिक व्‍याज लुबाडले जात आहे. महाराष्‍ट्र सायबर सेलने गुगलला नोटीस बजावत लोन ॲप कॅश ॲडव्‍हान्‍स, कोश, यस कॅश, हॅन्‍डी लोन आणि मोबाईल कॅश अशी ६९ ॲप तत्‍काळ हटविण्‍यात यावेत, अशी मागणी या नोटीसीच्‍या माध्‍यमातून केले आहे. मात्र आम्‍हाला अद्‍याप गुगलकडून उत्तर आलेले नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

या प्रकरणी महाराष्‍ट्र सायबर सेलने एका ॲपवर गुन्‍हाही दाखल केला आहे. या गुन्‍ह्याच्‍या तपासात मोठे रॅकेट उघड होण्‍याची शक्‍यता आहे. पोलिस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news