सीना धरणात 30 टक्के उपयुक्त पाणीसाठा, शेतकरी चिंतामुक्त

सीना धरणात 30 टक्के उपयुक्त पाणीसाठा, शेतकरी चिंतामुक्त
Published on: 
Updated on: 

योगेश गांगर्डे
कोंभळी : पुढारी वृत्तसेवा

सीना धरणात सध्या असलेल्या 503.27 दशलक्ष घनफूट पाणीसाठ्यातून चौथ्या आर्वतनासाठी 284 दशलक्ष घनफूट पाणी वापरण्यात येणार आहे. यानंतरही धरणात साधारण 258.27 दशलक्ष घनफूट पाणीसाठा राहणार आहे. हेच पाणी साधारण दोन ते अडीच महिने जाईल. पावसाळा लांबल्यानंतर बीड जिल्ह्यातील आष्टीसह कर्जत तालुक्यातील काही गावांना सीना धरणातून टँकरने पाणीपुरवठा केला जातो.

कर्जत तालुक्यातील हजारो शेतकर्‍यांना वरदान ठरत असलेले सीना धरण सध्या 30 टक्के इतका म्हणजेच 506.27 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा साधारण दोन ते अडीच महिने जाईल. यंदा मान्सून लवकर येत असल्यामुळे धरणात लवकरच नवीन पाण्याची आवक होणार असून, या पट्ट्यातील शेतकरी चिंतामुक्त झाला आहे.

सीना धरणातील उपलब्ध जलसाठ्याच्या सुयोग्य नियोजनातून लाभक्षेत्रातील अंदाजे एक हजार हेक्टर क्षेत्र ऐन उन्हाळ्यात ही सिंचनाखाली आल्याने लाभ क्षेत्रात फळे, ऊस आणि दूध उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. मुबलक प्रमाणात पाणी मिळाल्याने ऊस, फळे उत्पादक शेतकर्‍यांसमवेत पशुपालकांनाही मोठा दिलासा मिळाला.

सीना धरणाची एकूण 2400 दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असून, सध्या 506.27 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे. एका आवर्तनासाठी साधारण 284 दशलक्ष घनफूट पाणी लागते. या एका आवर्तनातून एकूण 900 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
सीना कालव्याचे नूतनीकरण झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय टळला आहे. सध्या उन्हाची काहिली असल्यामुळे विहिरी आणि कूपनलिकांनी तळ गाठला होता. पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. यामुळे शेतकरी धास्तावला होता.

सीना धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने शेतकर्‍यांची मागणी जोपर्यंत आहे, तोपर्यंत आवर्तन सुरू राहणार असून, पाऊस आल्यास व शेतकर्‍यांनी बंद करण्याची मागणी केल्यास आवर्तन बंद करण्यात येईल.

– बबन वाळके, उपविभागीय अधिकारी, सीना धरण प्रकल्प.

सीना धरण पाणी क्षमता-सिंचन क्षेत्र

धरण क्षमता : 2400 (द.ल.घ.फू.)
एकूण साठा : 1058.94 (द.ल.घ.फू.)
उपयुक्त साठा : 506.27 (द.ल.घ.फू.)
उपयुक्त टक्केवारी : 27.40
एकूण टक्केवारी : 44.11
उजवा कालवा : 81.45 क्युसेक
सरासरी : 81.45 क्युसेक
एकूण : 178. 25 क्युसेक
सिंचन क्षेत्र : 8445 हेक्टर
उजवा कालवा : 7672 हेक्टर
डावा कालवा : 773 हेक्टर
उपसा सिंचन : 1200 हेक्टर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news