पुढारी ऑनलाईन : सोने दराने आज गुरुवारी नवा सर्वकालीन उच्चांक गाठला. सोन्याचा दर ६७ हजारांजवळ पोहोचला आहे. आज शुद्ध सोने म्हणजे २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ६६,९७१ रुपयांवर खुला झाला. काल शुद्ध सोन्याचा दर ६६,८३४ रुपयांवर बंद झाला होता. आज पुन्हा सोन्याच्या दरात १३७ रुपयांची वाढ झाली. तर चांदीही महागली असून दर प्रति किलो ७४ हजारांवर खुला झाला आहे. (Gold Price Today)
दरम्यान, पुढील काही दिवसांत सोने प्रति १० ग्रॅम ७० हजारांवर जाण्याची शक्यता आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ७५ हजार पार जाऊ शकते, असे अंदाज सराफा बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६६,९७१ रुपये, २२ कॅरेट ६१,३४५ रुपये, १८ कॅरेट ५०,२२८ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ३९,१७८ रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा दर प्रति किलो ७४,०११ रुपयांवर गेला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दराने उसळी घेतली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरात ५.०३ डॉलरने वाढ झाली असून त्याचा प्रति औंस २,१९६.०५ डॉलर दराने व्यवहार होत आहे. तर चांदी प्रति औंस २४.६२ डॉलर पातळीवर व्यवहार करत आहे.
२०२४ मध्ये जगभरात मंदीची शक्यता तसेच लग्नसराईमुळे वाढलेली मागणी, कमकुवत झालेला डॉलर इंडेक्स आणि जगभरातील केंद्रीय बँकांकडून होत असलेल्या खरेदीमुळे सोन्याच्या दरात तेजी आली आहे.
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. पण, दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे नमूद केलेले असते. (Gold Price Today)
हे ही वाचा :