Stock Market Updates | सेन्सेक्सचा ७३,७५० अंकाला स्पर्श, निफ्टी २२,३०० वर, Bajaj चे शेअर्स आघाडीवर | पुढारी

Stock Market Updates | सेन्सेक्सचा ७३,७५० अंकाला स्पर्श, निफ्टी २२,३०० वर, Bajaj चे शेअर्स आघाडीवर

पुढारी ऑनलाईन : जागतिक सकारात्मक संकेत आणि अमेरिकेचा महागाई दर जाहीर होण्यापूर्वी आज गुरुवारी भारतीय शेअर बाजाराने तेजीत सुरुवात केली. बाजारातील तेजीत बँकिंग आणि फायनान्सियल शेअर्स आघाडीवर आहेत. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ७५० हून अधिक अंकांनी वाढून ७३,७५० च्या अंकांला स्पर्श केला. (Stock Market Updates) तर निफ्टी २२,३०० वर व्यवहार करत आहे.

सेन्सेक्सवर बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक, पॉवरग्रिड, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, सन फार्मा, विप्रो, एसबीआय, जेएसडब्ल्यू स्टील, एलटी हे शेअर्स सर्वाधिक वाढून व्यवहार करत आहेत. तर एचसीएल टेक, टेक महिंद्रा या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

निफ्टीवर बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, पॉवर ग्रिड, हिरोमोटोकॉर्प, डिव्हिज लॅब हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांदरम्यान वाढले आहेत. तर बजाज ऑटो, श्रीराम फायनान्स, एचसीएल टेक या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. निफ्टी बँक आणि निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस निर्देशांक तेजीत आहेत.

क्षेत्रीय निर्देशांकांची काय स्थिती?

बीएसई मिडकॅप निर्देशांक सपाट पातळीवर व्यवहार करत आहे, तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.६ टक्क्यांनी वाढला आहे. रियल्टी वगळता पॉवर, बँक, कॅपिटल गुड्स आयटी, हेल्थकेअर, ऑईल आणि गॅस हे सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढून हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. (Stock Market Updates)

जागतिक बाजार

आशियाई शेअर बाजारांत घसरण झाली आहे. ब्लू-चिप CSI300 निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात एक महिन्याच्या निचांकी पातळीवर आला. तर शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.१ टक्के घसरला. MSCI चा आशिया-पॅसिफिक शेअर्सचा निर्देशांकही घसरला आहे. अमेरिकेतील निर्देशांक काल वधारून बंद झाले. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज सरासरी १.२२ टक्क्यांनी वाढला. तर S&P 500 निर्देशांक ०.८६ टक्क्यांनी आणि Nasdaq Composite ०.५१ टक्क्यांनी वाढला.

हे ही वाचा :

 

Back to top button