पुढारी ऑनलाईन डेस्क
Gold Silver Price : सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठा बदल झाला आहे. आज गुरुवारी शुद्ध सोन्याचा दर ५० हजारांच्या जवळ (प्रति १० ग्रॅम) तर चांदीचा दर ६३ हजारांवर (प्रति किलो) गेला. आज सोन्याच्या दरात ५११ रुपयांनी वाढ होऊन ते प्रति १० ग्रॅम ४९,९६८ रुपयांवर पोहोचले. तर सराफा बाजारात चांदीचा दर प्रति किलो ६४,४०० रुपयांवर खुला झाला. दरम्यान, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) गुरुवारी सोने आणि चांदी दरात तेजी दिसून आली.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.१७) २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९,९६८ रुपये, २३ कॅरेट ४९,७६८ रुपये, २२ कॅरेट ४५,७७१ रुपये, १८ कॅरेट ३७,४७६ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा भाव २९,२३१ रुपये होता. तर चांदी प्रति किलो ६३,४०० रुपये होती. (हे दुपारी २ पर्यंतचे अपडेटेड दर असून त्यात बदल होऊ शकतो)
काल बुधवारी शुद्ध सोन्याचा दर ४९,४५७ रुपयांवर जाऊन बंद झाला होता. त्यात पुन्हा आज तेजी दिसून आली. युक्रेन- रशियातील तणावाचा परिणाम मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) दिसून येत आहे. जगात काही भागात तणावाची परिस्थिती अथवा संकटे निर्माण होतात त्यावेळी गुंतवणूकदार सेफ हेवन मालमत्ता म्हणून सोन्यात गुंतवणूक करतात. यामुळे सोने तेजीत येते. सध्या अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सोने ८ महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहे.
तीन वर्षापूर्वी सोन्याच्या दराने ५६,२०० रुपयांपर्यंत उसळी घेत उच्चांक गाठला होता. पण २०२१ मधील ऑगस्टमध्ये सोने ४८ हजार रुपयांवर आले. आता पुन्हा सोने ५० हजारांच्या जवळ पोहोचले आहे.
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.
हे ही वाचा :