Hypertension and sleep, जाणून घ्‍या नवीन संशोधन काय सांगते?

Hypertension and sleep, जाणून घ्‍या नवीन संशोधन काय सांगते?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आधुनिक जीवनशैलीमुळे विविध आजारांना आमंत्रण मिळत आहे. त्‍यापैकीच एक म्‍हणून उच्‍च
रक्‍तदाब (हाय ब्‍लड प्रेशर) आजाराची ओळख आहे. काही वर्षांपूर्वी ज्‍येष्‍ठ नागरिकांना भेडसविणारा हा आजार आता तरुणाईलाही आपल्‍या विळख्‍यात घेत आहे. झोप आणि रक्‍तदाब याचा कितपत संबंध आहे, यावर नुकतेच ऑस्ट्रेलियातील ॲडलेड येथील फ्लिंडर्स विद्यापीठातील संशोधकांनी संशोधन केले. ( Hypertension and sleep ) जाणून घेवूया नवीन संशोधनातील निष्‍कर्षांबाबत…
झोप आणि रक्‍तदाब यावर फ्लिंडर्स विद्यापीठात झालेले संशोधन मेडिकल जर्नल 'हायपरटेन्शन ट्रस्टेड सोर्स'मध्ये प्रकाशित झाले आहे.

Hypertension and sleep : अभ्यासात काय आढळले?

रक्‍तदाब आणि झोप यावरील संशोधनात ३८ ते ६२ वयोगटातील १२ हजार २८७ जणांनी सहभाग घेतला. यामध्‍ये ८८ टक्‍के पुरुष होते. विशेष म्‍हणजे सहभागी झालेल्‍याचे वजन अधिक होते. संशोधनांनी नियमित झोप आणि रक्‍तदाबाचे निरीक्षण केले. यामध्‍ये असे आढळले की, झोपेची वेळ अनियमित असेल तर उच्च रक्तदाबाचा धोका ९ ते १७ टक्‍के वाढू शकतो. तसेच रात्री तुमच्‍या नियमित झोपेच्‍या वेळत ३४ मिनिटे एवढा विलंब झाला तरी उच्च रक्तदाबाचा धोका ३२ टक्‍क्‍यांनी वाढतो. तसेच संशोधनात स्‍पष्‍ट झाले की, अनियमित झोपेमुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो.

Hypertension and sleep : नवीन संशोधनावर तज्‍ज्ञ काय म्‍हणतात?

रक्‍तदाब आणि झोप यावरील झालेल्‍या संशोधनातील निष्कर्षांची पडताळणी करण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याबाबत बोलताना मेडस्टार हार्ट अँड व्हॅस्कुलर इन्स्टिट्यूटचे कार्डिओलॉजीचे अध्यक्ष डॉ. ॲलन  टेलर म्हणतात की, हे संशोधन महत्त्‍वपूर्ण आहे. उच्च रक्तदाबाच्या जोखमीवर विश्रांतीचा कसा परिणाम करू शकते, याबद्दल माहिती देण्यासाठी अधिक हे उपयुक्‍त ठरणार आहे. शरीर निरोगी ठेवण्‍यासाठी झोप ही आहाराप्रमाणेच एक महत्त्‍वपूर्ण गोष्‍ट आहे. आरोग्य सुधारण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या जीवनशैलीचा स्‍वीकार करता हे महत्त्‍वाचे ठरते.

लिंग, वंश आणि सामाजिक, आर्थिक स्थिती याचा आरोग्‍यावर परिणाम होत असतो. लोक कुठे राहतात, त्‍यांना कोणत्‍या सुविधा उपलब्ध आहेत हे महत्वाचे आहे. योग्‍य आहार आणि विश्रांती यावरच शारीरिक आरोग्‍य अवलंबून असते. झोप आणि रक्‍तदाब यांचा परस्‍पराशी संबंध असतो, असे मत कॅलिफोर्निया-इर्विन विद्यापीठाच्‍या आरोग्य विभागातील प्राध्यापक डॉ. कॅरेन डी. लिंकन यांनी व्‍यक्‍त केले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news