IFFI Goa : मराठवाड्याच्या मातीतील ‘ग्लोबल आडगाव’ चित्रपटाची इफ्फीत हवा

ग्लोबल आडगाव
ग्लोबल आडगाव
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठवाड्याच्या मातीतील 'ग्लोबल आडगाव' झळकला. (IFFI Goa ) काही दिवसांपूर्वी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी हा चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र सरकारकडून पाठवला होता. सिल्व्हर ओक फिल्म्स अँड एंटरटेनमेंट छत्रपती संभाजीनगर चित्रपट निर्मिती संस्थेमार्फत व सोलापूरचे जिल्ह्याचे भूमिपुत्र मनोज कदम निर्मित हा चित्रपट आहे. (IFFI Goa )

संबंधित बातम्या –

२१ ते २४ नोव्हेबरपर्यंत जगभरातील चित्रपटप्रेमी हा चित्रपट पाहू शकणार आहेत. या चित्रपटाची निवड ही २९ सिनेमांमधून महाराष्ट्र शासन सांस्कृतिक मंत्रालयाकडून करून इफ्फी गोवा फिल्म बझारसाठी करण्यात आली आहे.

'ग्लोबल आडगाव' या सिनेमामधून शेती, माती, ग्रामसंस्कृती त्याचबरोबर ग्लोबलायझेशन अशा महत्त्वाच्या विषयावर या सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलेले आहे. सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षक बघत असताना प्रेक्षक आपल्या डोळ्यातील अश्रूंना थांबू शकत नाही अशा अत्यंत भावनिक, संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयाला या सिनेमाच्या माध्यमातून स्पर्श करण्यात आलेला आहे.

प्रेक्षकांना भावनिक करणाऱ्या 'ग्लोबल आडगाव'या चित्रपटाचे अनेक पुरस्कारप्राप्त लेखक दिग्दर्शक डॉ. अनिलकुमार साळवे निर्माते मनोज कदम, तर अमृत मराठे सह-निर्माता आहेत. या चित्रपटाला आधी अमेरिका येथील न्यू जर्सी येथील उत्कृष्ट लेखन पुरस्कार मिळाला आहे. पुणे इंटनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, मेलबर्न फेस्टिव्हल असे ११ पेक्षा अधिक नामांकने मिळाली आहेत.

या चित्रपटामध्ये अभिनेते सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, उपेंद्र लिमये, अनिल नगरकर, सिद्धी काळे, शिवकांता सुतार, अशोक कानगुडे, महेंद्र खिल्लारे, रौनक लांडगे, अनिल राठोड, संजीवनी दिपके, डॉ. सिद्धार्थ तायडे, साहेबराव पाटील, प्रदीप सोळंके, रानबा गायकवाड, विष्णू भारती,जालिंदर केरे, विक्रम त्रिभुवन, विष्णू चौधरी, परमेश्वर कोकाटे, प्राजक्ता खिस्ते, ऋषिकेश आवाड विक्की गुमलाडू, मंगेश तुसे, फुलचंद नागटिळक, स्नेहल कदम, वैदेही कदम, गणेश लोहार , मधुकर कर्डक, विद्या जोशी, अभिजित मोरे , सुखदेव मोरे, सुदर्शन कदम, नयना मोरे अर्चना कदम यांच्यासह ६०० पेक्षा जास्त कलाकार या चित्रपटात आहेत.

गायक आदर्श शिंदे , डॉ. गणेश चंदनशिवे आणि जसराज जोशी यांनी गीतांना स्वरसाज चढविला आहे. संगीत विजय गावंडे, ध्वनी विकास खंदारे, कला दिग्दर्शन संदीप इनामके, संकलन श्रीकांत चौधरी, डीआय दिशा रंगालय, मेकअप मंगेश गायकवाड नृत्य रुपेश पसपुल यांनी केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news