तापी नदीत मुलगी बुडाली; गणेश विसर्जनावेळी दुर्घटना

तापी नदीत मुलगी बुडाली; गणेश विसर्जनावेळी दुर्घटना
Published on
Updated on

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: गणेश विसर्जनावेळी तापी नदीत मुलगी बुडाली. तिच्‍या भावाला वाचवण्‍यात यश आले.

भुसावळ शहरातील झेडटीसी परिसरात मनीष यादव हे वास्तव्याला आहेत.

दीड दिवसानंतर ते आज सकाळी गणेश विसर्जन करण्यासाठी झेडटीसी जवळच्या तापी नदी पात्रात पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्यासह गेले होते.

पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांची मुलगी अनन्या पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली.

मुलगा आर्यनराज हा देखील पाण्यात उतरल्याने तो देखील बुडू लागला होता. त्यांनी आरडाओरडा केला.

परिसरातून काही जणांनी घटनास्थळी धाव घेतली.

आर्यनराज याला वाचविण्यात यश आले असले तरी अनन्या मनीष यादव बुडाली.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अनन्याच्या शोध सुरू होता.

हेही वाचलं का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news