Germany vs Japan : विश्वचषकात मोठा उलटफेर; जपानकडून जर्मनी पराभूत

Germany vs Japan : विश्वचषकात मोठा उलटफेर; जपानकडून जर्मनी पराभूत

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील तिसऱ्या दिवशीचा दुसरा सामना जर्मनी विरूध्द जपान (Germany vs Japan) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात २०१४ सालच्या विश्वविजेत्या जर्मनीचा जपाने २-१ ने पराभव केला. जर्मनीचा पराभव करत फुलबॉल विश्वचषक स्पर्धेत जपानने विजयी सलामी दिली. या विश्वषक स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल आपल्याला पाहायला मिळत आहेत. सौदी अरेबिया विरूध्दच्या सामन्यात लियोनेल मेस्सीच्या बलाढ्य अर्जेटिनाला २-१ गोल पराभवाला सामोरे जावे लागले होते. आजच्या सामन्यात देखील असाच धक्कादायक निकाल आपल्याला पाहायला मिळाला बलाढ्य जर्मनीला जपानने २-१ गोल फरकाने पराभूतकरून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

जपानचा पहिलाच गोल अवैध

सामन्याच्या सुरुवातीलाच जपानने जबरदस्त आक्रमण करत सामन्याच्या आठव्या मिनिटाला गोल केला. हा गोल जपानचा खेळाडू डायझेन मेडाने जर्मन बचाव भेदून केला. परंतु रेफरींनी व्हीआर तपासणी केल्यामुळे हा गोल अवैध घोषिक करण्यात आला. गोल करताना डायझेन मेडा ऑफसाईडला उभे असल्याचे रेफरींच्या निदर्शनास आल्याने जपानचा गोल अवैध घोषिक करण्यात आला.

त्यानंतर जर्मनीने जपानवर अनेक चढाया केल्या. यावर कडव्या जपानदेखील जर्मनीच्या चढायांनी प्रतिकार करत चांगला बचावात्मक खेळ केला. सामन्याच्या पहिल्या हाफ मध्ये जर्मन संघाने जपानच्या गोलपोस्टवर एकूण १५ शॉट मारले त्यापैकी ५ शॉट टार्गेटवर होते. इतक्या चढाया करूनही बलाढ्य जर्मनीला जपानविरूध्द एकही मैदानी गोल करता आले नाही. यावेळी जपानच्या बचावपटूंनी जर्मनीच्या आघाडी फळीतील खेळाडूंना चांगलीच झुंज देत संघासाठी अप्रतिम कामगिरी केली.

जर्मनीची १-० ने आघाडी

पहिल्या हाफमधील ३३ व्या मिनिटाला जर्मनीच्या (Germany vs Japan) एल्के गुंडोनने पहिला गोल केला. त्याने पेनल्टीवर गोल केला. जपानचा गोलरक्षक साकाईमुळे जर्मनीला ही पेनल्टी मिळाली. डेव्हिड राऊमला रोखण्याच्या प्रयत्नात तो अंगावर पडला. या कारणामुळे रेफ्रींनी जर्मनीला पेनल्टी दिली. या सुवर्ण संधीचा फायदा घेत एल्के गुंडोनने गोल करुन सामन्यात संघाचे खाते उघडले.

दुसऱ्या हाफमध्ये जर्मन संघाने आघाडी दुप्पट करण्याच्या इराद्याने जपानवर वेगवान आक्रमणे केली. या आक्रमक खेळीने सहाय्याने जपानच्या खेळाडूंना जर्मनीने चांगलेच खेळवून ठेवले. परुंतु जपानच्या बचावपटूंनी जर्मनीच्या आक्रमणाला चांगलीच झुंज देत त्यांना गोल करण्यापासून रोखले. सामन्याच्या ७० व्या मिनिटाला जर्मनीने जपानवर वेगवान चढाई केली. यावेळी जर्मन खेळाडूंनी सलग तीन वेळा गोलपोस्टवर शॉट मारले परंतु जपानचा गोलकीपर साकाईने अप्रतिम खेळी करून जर्मन संघाचे आक्रमण धुडकावून लावले. यानंतर काऊंटर अटॅक करताने जपानने लगेच वेगवान चाल रचत जर्मनीच्या गोलच्या दिशेने चढाई केली परंतु जर्मनीचा अनुभवी गोलकीपरने बचाव करत जपानला रोखले.

जपानची जर्मनीशी १-१ ने बरोबरी

जपाननेदखील आक्रमक खेळी करत जर्मनीवर अनेक चढाया केल्या सामन्याच्या ७५ मिनिटाला जपान संघाच्या खेळाडूने गोलवर मारलेला शॉट जर्मनीचा गोलकीपर मॅन्युएल न्युअर अडवला. अडवलेला बॉल पुन्हा जपानच्या खेळाडूच्या पायात गेला. त्यावेळी बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरेल्या रिस्तु डोआनने जपानलाठी गोल करत जर्मनीशी १-१ अशी बरोबरी केली.

जपानने घेतली विजयी आघाडी

७५ व्या मिनिटाला गोल केल्यानंतर गोलची परत फेड करण्याच्या इराद्याने जर्मन संघाने जपानवर वेगवान चढाया केल्या यावेळी जपानच्या बचावपटूंना चकवून त्यांना गोल करण्यात यश आले नाही. यानंतर जर्मनीवर काऊंटर अटॅक करण्याची चांगली संधी जपानला मिळाली. या संधीचा फायदा घेत जपानच्या टाकुमा असानोने शून्य कोनात गोल करून संघाला २-१ अशी आघाडी घेतली. टाकुमा हा देखील बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता. या सामन्यात बलाढ्य जर्मनीला २-१ अशा गोल फरकाने पराभूत करून जपानने विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news