नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन: देशाचे संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झालेल्या घटनेची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. दरम्यान, माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी बिपीन रावत यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे सांगितले. तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंग हे संसदेत रवाना झाले आहेत.
जनरल बिपीन रावत यांच्या हे लष्करी अधिकाऱ्यांना व्याख्यान देण्यासाठी कुन्नूर येथे जात होते. त्यावेळी त्यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी मधुलिका यांच्यासह १४ जण होते. या हेलिकॉप्टरची अवस्था खूपच भीषण झाली आहे. हेलिकॉप्टर अपघाताची माहिती मिळताच लष्करी हालचाली वाढल्या असून वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या दिल्लीत कॅबिनेट बैठक सुरु असून यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घटनेची माहिती दिली आहे.
हेही वाचलं का?