GDP : जीडीपीची गरुडझेप

GDP : जीडीपीची गरुडझेप

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : GDP : मजबूत अर्थव्यवस्था म्हणून ओळख बनलेल्या भारताच्या जीडीपीने 3.75 ट्रिलियन डॉलर म्हणजेच पावणेचार लाख कोटी डॉलरचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. अवघ्या नऊ वर्षांत दहाव्या स्थानावरून झेप घेत भारतीय अर्थव्यवस्थेने जगातील पाचवे स्थान पटकावले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कार्यालयाने केलेल्या ट्विटच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेचे हे लखलखते चित्र समोर आले आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारताच्या पुढे असलेल्या देशांमध्ये अमेरिका, चीन, जपान व जर्मनी यांचा समावेश आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेचा आकार 26.85 ट्रिलियन डॉलर इतका असून, चीन व जर्मन अर्थव्यवस्थेचा आकार क्रमशः 19.37 ट्रिलियन डॉलर व 4.30 ट्रिलियन डॉलर इतका आहे. भारताच्या खाली जे देश आहेत, त्यात ब्रिटन (3.15 ट्रिलियन डॉलर), फ्रान्स (2.92 ट्रिलियन डॉलर), कॅनडा (2.08 ट्रिलियन डॉलर), रशिया (1.84 ट्रिलियन डॉलर) व ऑस्ट्रेलिया (1.55 ट्रिलियन डॉलर) यांचा समावेश आहे.

GDP : मूडीजनेही वर्तवला भरघोस अंदाज

दरम्यान, जगविख्यात रेटिंग एजन्सी असलेल्या मूडीजने रविवारी भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज वर्तवला. जूनच्या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था 6 ते 6.3 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे. गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने वाढीचा दर 8 टक्के अपेक्षित असल्याचे म्हटले होते. या शिवाय पतधोरण समितीने जीडीपी वाढीचा दर या आर्थिक वर्षात 6.5 टक्के राहील असा अंदाज वर्तवला होता. दोन्ही संस्थांचे निकष वेगळे असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेची तब्येत उत्तम असण्यावर त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

GDP : नऊ वर्षांत भारत दहाव्या स्थानावरून पाचव्या

2014 साली भारताची अर्थव्यवस्था जगात दहाव्या क्रमांकावर होती. त्यानंतर अवघ्या नऊ वर्षांत भारताने पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील चमकता तारा म्हणून भारताकडे पाहिले जात असल्याचे अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

GDP : जगातील टॉप 5 अर्थव्यवस्था

* अमेरिका : 26.85 ट्रिलियन डॉलर * चीन :19.37 ट्रिलियन डॉलर * जपान : 4.41 ट्रिलियन डॉलर * जर्मनी : 4.30 ट्रिलियन डॉलर * भारत : 3.75 ट्रिलियन डॉलर

हे ही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news