Chinese woman spy : गयामध्‍ये चिनी महिला गुप्‍तहेराचा वावर ! दलाई लामा आणि बोधगया परिसरावर नजर ठेवल्‍याचा संशय

तपास संस्‍थांनी जारी केलेले चिनी महिला गुप्‍तहेराचे रेखाचित्र (स्‍केच).
तपास संस्‍थांनी जारी केलेले चिनी महिला गुप्‍तहेराचे रेखाचित्र (स्‍केच).
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बिहारमधील गया शहरात चिनी महिला गुप्‍तहेराचा वावर असल्‍याचा संशय पोलिस आणि तपास संस्‍थांनी व्‍यक्‍त केला आहे. संशयित महिला गुप्‍तहेराचे रेखाचित्रही (स्‍केच) जारी करण्‍यात आले आहे. या गुप्‍तहेर महिलेने दलाई लामा आणि बोधगया परिसरावर नजर ठेवल्‍याचा संशयही तपास संस्‍थांनी व्‍यक्‍त केला आहे. ( Chinese woman spy )

तिबेटमधील बौद्ध धर्मगुरु दलाई लामा हे मागील काही दिवस गयामध्‍ये आहेत. त्‍यांना चार स्‍तरांची कडेकोट सुरक्षा आहे. त्‍याच्‍या सुरक्षेवर दहशतवाद विरोधी पथकाचेही (एटीएस) लक्ष आहे. बिहारमधील दोन हजार पोलिसांसह अन्य सुरक्षा यंत्रणाही कार्यरत आहेत. अशातच त्यांच्यावर चीनमधील महिला गुप्‍तहेर नजर ठेवून असल्‍याची माहिती समोर आली आहे. जिल्हा पोलिस प्रशासन आणि गुप्तचर यंत्रणा या संशयित महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. बोधगया पोलिसांनी तीन महिन्यांपूर्वी एका हॉटेलमधून एका संशयित चिनी गुप्‍तहेराला ताब्यात घेतले होते. त्‍यामुळे आता अधिक सतर्कता घेण्‍यात येत असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

Chinese woman spy : रेखाचित्र जारी

संशयित चिनी महिला गुप्‍तहेराचे नाव सॉन्‍ग जिआलॉन असे आहे. तिचा व्हिसा क्रमांक 901BAA2Jआहे. सडपातळ आणि डोक्यावर अतिशय लहान केस असलेल्या या संशयित महिलेने संन्‍यासी महिलेचे रूप धारण केले आहे, अशी माहिती पोलिस मुख्‍यालयाने दिली. संबंधित महिलेच्‍या शोधासाठी गुप्तचर यंत्रणाही माहिती देणाऱ्यांची मदत घेत आहे. संशयित महिला चीनची गुप्तहेर असून, दलाई लामा आणि बोधगया यांच्याशी संबंधित कार्यक्रमाची माहिती घेण्यासाठी ती गया येथे आली असावी, असा संशय व्‍यक्‍त होत आहे.

कोरोनाचे अचानक उद्भवलेले प्रकरण आणि त्यात सातत्याने होणारी वाढ यामुळे रविवारपासून जिल्हा प्रशासनाचे सर्व लक्ष केंद्रीत होत असल्याने हे कामही अवघड होत आहे. गेल्या सहा दिवसांत आतापर्यंत १९ परदेशी नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. परदेशी पाहुण्यांसोबतच जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांनाही मास्क अनिवार्य केले आहेत. तिबेट, भूतान, व्हिएतनाम, थायलंड, जपान, म्यानमार या देशातून येणाऱ्या परदेशी पाहुण्यांच्‍या संख्‍येत वाढ झाल्‍याने तपासात अडचण येत असल्‍याचे सूत्रांनी म्‍हटले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news