Gautam Adani: देशातील २२ राज्यात गुंतवणूक; पण सर्वच ठिकाणी BJP नाही- गौतम आदानी

Gautam Adani:  देशातील २२ राज्यात गुंतवणूक; पण सर्वच ठिकाणी BJP नाही- गौतम आदानी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांचा अदानी ग्रुप हा देशातील टॉप तीन उद्योग समूहापैकी एक आहे.  मात्र, उद्योगपती अदानी यांच्या व्यवसायाच्या भरभराटीमागे पीएम नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध हे आहे, असा आरोप अनेकांकडून त्यांच्यावर केला जातो.  या विषयी बोलताना ते म्हणाले, अदानी ग्रुपला याचा आनंद आहे की, देशातील २२ राज्यांमध्ये आमच्या ग्रुपची गुंतवणूक असून या ठिकाणी काम सुरू आहे. परंतु, या सर्वच राज्यात बीजेपी सरकार नसल्याचेही अदानी यांनी स्पष्ट करत, त्यांच्यावर होत असलेले आरोप तथ्यहीन असल्याचे त्यांनी सांंगितले आहे.  इंडिया टिव्हीला दिलेल्या एका कार्यक्रमावेळी त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले.

मुलाखतीदरम्यान ते पुढे म्हणाले, आम्ही केरळमध्ये डाव्या आघाडीच्या सरकारसोबत काम करत आहोत. बंगालमध्ये ममता दीदींसोबत तर नवीन पटनायक जी, जगनमोहन रेड्डी, केसीआर यांच्यासोबतही अदानी ग्रुप काम करत आहे, असे त्यांनी सांंगितले. जिथे जिथे प्रादेशिक पक्षांची सरकारे आहेत तिथे ते काम करत आहेत. त्यामुळे सरकार कोणतेही असो, आम्हाला आमचे काम करण्यात कोणतीच अडचण नसल्याचेही ते म्हणाले.

अदानी पुढे म्हणाले, "मला सांगायचे आहे की, तुम्ही मोदीजींकडून कोणतीही वैयक्तिक मदत घेऊ शकत नाही, परंतू तुम्ही त्यांच्याशी धोरणाबद्दल बोलू शकता, देशाच्या हिताविषयी त्यांच्याशी बोलू शकता. मी देखील चर्चा करू शकतो, परंतु जे धोरण बनवले जाते ते सर्वांसाठी असते, ते केवळ अदानी समूहासाठी बनलेले नसते, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेसशासित राजस्थानमध्ये झालेल्या 68,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा संदर्भ देताना उद्योगपती गौतम आदानी म्हणाले, "गुंतवणूक हा आमचा सामान्य व्यवसाय आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निमंत्रणावरून मी तिथे गुंतवणूकदारांच्या परिषदेसाठी गेलो होतो. यानंतर, राहुल गांधीजींनीही स्वत: राजस्थानमधील आमच्या गुंतवणुकीचे कौतुक केले. मला माहीत आहे की, राहुल गांधी यांची धोरणे ही विकासविरोधी नाहीत, असेही ते या कार्यक्रमादम्यान म्हणाले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news