ऑनलाईन धर्मांतर : ‘या’ तीन प्रकारच्या ऑनलाईन गेम्सवर केंद्र सरकार बंदी घालणार

ऑनलाईन धर्मांतर : ‘या’ तीन प्रकारच्या ऑनलाईन गेम्सवर केंद्र सरकार बंदी घालणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑनलाईन गेम्सचा वापर सट्टेबाजी आणि धर्मांतरणासाठी केला जात असल्याची बाब चव्हाट्यावर आली असल्याच्या पार्श्वभूमीवर तीन प्रकारच्या ऑनलाईन गेम्सवर बंदी आणण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. ज्या गेम्समुळे ऑनलाईन गेमचे व्यसन लागू शकते, अशा गेमही बंदीच्या कक्षेत आणल्या जातील, असे केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.

ऑनलाईन गेम्सचे व्यसन लागून माणूस त्यात तासनतास गुरफटून जाऊ शकतो, हे आतापर्यंत सर्वश्रुत होते. पण आता या माध्यमाचा वापर धर्मांतरणासाठीही केला जात असल्याचे उघडकीस आल्याने सरकार खडबडून जागे झाले आहे. ऑनलाईन गेम्सच्या अनुषंगाने नवीन नियमावली जाहीर केली जाईल, असे चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले. बंदी आणल्या जाणाऱ्या गेम्ससाठीचे निकष कशा स्वरूपाचे राहणार, याचा खुलासा मात्र त्यांनी केला नाही. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, "आम्ही पहिल्यांदाच ऑनलाइन गेमिंगसंदर्भात एक आराखडा तयार केला आहे. ज्यामध्ये आम्ही देशात ३ प्रकारच्या गेमला परवानगी देणार नाही. सट्टेबाजीचा समावेश असलेल्या, वापरकर्त्यांसाठी हानीकारक ठरणाऱ्या आणि व्यसनाधीन घटकांचा समावेश असलेल्या ऑनलाइन गेमिंगवर देशात बंदी घातली जाणार आहे."

धर्मांतर प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला  बेड्या

ऑनलाईन गेमिंग अॅपच्या माध्यमातून अल्पवयीन हिंदू मुलांना हेरून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याचे प्रकरण उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये उघडकीस आले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतानाच सरकारही आता ऑनलाईन गेमिंगबाबत कठोर पाऊले उचणार आहे. ऑनलाईन गेमिंग अॅपच्या माध्यमातून धर्मांतर करणारा मुख्य सूत्रधार शाहनवाज खान मकसूद ऊर्फ याला रविवारी दुपारी अलिबागमधून मुंब्रा पोलिसांनी अटक केली. तो अलिबागच्या एका लॉजमध्ये लपून बसला होता. त्यास पुढील तपासासाठी यूपी पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. गाझियाबाद पोलीस, इंटेलिजन्स ब्यूरो (आयबी), यूपी एटीएस, यूपी पोलीस सायबर सेल आणि मुंबई व ठाणे पोलिसांचे पथक आदी यंत्रणा या घटनेचा तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news