G20 Bilateral Ties: G20 परिषदेपूर्वी ‘या’ तीन देशांसोबत आज बैठक; PM मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा

G20 Bilateral Ties
G20 Bilateral Ties

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारत यावर्षी G20 चे यजमान पद भूषवत आहे. दिल्लीत उद्या शनिवारी(दि.9) आणि रविवारी (दि.10) दोन दिवसीय G20 शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर G20 देशातील प्रतिनिधी भारतात नवी दिल्ली येथे येण्यासाठी सुरुवात झाली आहे. त्यांच्या भव्य स्वागताची भारताकडून तयारी करण्यात आली आहे. G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदी यांच्या 15 हून अधिक द्विपक्षीय बैठका होणार आहेत. यामधील तीन महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठका आज (शुक्रवारी) होणार आहेत. G20 परिषदेदरम्यानच्या 'या' बैठकींमुळे देशांतील विकासात्मक सहकार्य मजबूत करण्याची संधी निर्माण होणार आहे, असे पीएम मोदी यांनी म्हटले आहे. या संदर्भातील माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून दिली आहे. (G20 Bilateral Ties)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी (दि.८ सप्टेंबर) संध्याकाळी तीन देशांसोबत द्विपक्षीय संबंधांवर बैठका घेत आहेत. यामध्ये ते मॉरिशसचे पंतप्रधान कुमार जुग्नौथ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी चर्चा करणार आहेत. या सर्व बैठका पंतप्रधान मोदी यांच्या निवास्थानी होणार आहेत. यासाठी मी उत्सुक असल्याचेही पीएम मोदी यांनी म्हटले आहे. (G20 Bilateral Ties)

पीएम मोदी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, या द्विपक्षीय बैठकांमुळे भारताच्या 'या' राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला जाणार आहे. यामुळे भारत आणि G20 देशांमधील विकासात्मक सहकार्य आणखी मजबूत करण्याची संधी मिळेल, असेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे. (G20 Bilateral Ties)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news