नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : Fuel price : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून सलग सातव्या दिवशी मंगळवारी पेट्रोल दरात वाढ करण्यात आली. इंधन दर मात्र स्थिर ठेवण्यात आले आहेत. पेट्रोल दरात झालेली वाढ 35 पैशांची आहे. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे लिटरचे दर 110 रुपयांच्या पुढे म्हणजे 110.04 रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे डिझेल दराची शंभरीकडे वाटचाल सुरु आहे.
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे प्रति बॅरलचे दर 85 डॉलर्सपर्यंत वधारले आहेत. तुलनेने कच्चे तेल स्थिर असले तरी तेल कंपन्यांकडून इंधन दरात वाढ सुरुच आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचे लिटरचे दर 115.85 रुपयांवर गेले आहेत. तर डिझेल 106.62 रुपयांवर स्थिर आहेत. तामिळनाडूतील चेन्नई आणि प. बंगालमधील कोलकाता येथे पेट्रोल क्रमशः 106.66 आणि 110.50 रुपयांपर्यंत वधारले आहे. दुसरीकडे डिझेल 102.59 आणि 101.56 रुपयांवर स्थिर आहे.