INS Vela joins Navy : पाक आणि चीनवर ‘आयएनएस वेला’ ठेवणार नजर

नौदलप्रमुख ऍडमिरल करमबीर सिंग यांच्या हस्ते आयएनएस वेला ही पाणबुडी आज नौदलास सुपूर्द करण्यात आली.
नौदलप्रमुख ऍडमिरल करमबीर सिंग यांच्या हस्ते आयएनएस वेला ही पाणबुडी आज नौदलास सुपूर्द करण्यात आली.
Published on
Updated on

भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट-७५ अंतर्गत सहा पाणबुड्यांपैकी चौथी पाणबुडी 'आयएनएस वेला' ( INS Vela joins Navy ) ही गुरुवारी नौदलाच्या ताफ्यात सामील झाली. नौदलप्रमुख ऍडमिरल करमबीर सिंग यांच्या हस्ते ही पाणबुडी नौदलास सुपूर्द करण्यात आली. मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे हा औपचारिक सोहळा पार पडला.

फ्रान्सच्या मे. नेव्हल ग्रुपच्या (पूर्वीची डीसीएनएस) सहकार्याने मुंबईतल्या माझगाव डॉक शिपयार्डस लिमिटेडमध्ये स्कॉर्पिन श्रेणीतील ही पाणबुडी बांधण्यात आली. नौदलाच्या ताफ्यात आयएनएस वेलाच्या रुपात स्कॉर्पियन प्रकारातील ही चौथी पाणबुडी सामील झाली आहे.
( INS Vela joins Navy ) आयएनएस वेला ही पश्चिम नौदल कमांडच्या पाणबुडीच्या ताफ्याचा भाग असेल आणि शस्त्रागाराचा आणखी एक शक्तिशाली भाग असेल.

खासदार अरविंद सावंत, पश्चिमी नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हॉईस अॅडमिरल आर. हरी कुमार, माझगाव जहाजबांधणी गोदीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्हॉईस अॅडमिरल (निवृत्त) नारायण प्रसाद यांच्यासह संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ प्रशासकीय आणि लष्करी अधिकारी या समारंभात उपस्थित होते. याधीच्या वेला या रशियन बनावटीच्या फॉक्सट्रॉट श्रेणीच्या आणि २००९मध्ये सेवानिवृत्त झालेल्या पाणबुडीचा कर्मचारी वर्ग देखील या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून हजर होता.

आयएनएस वेलाचे वैशिष्ट्य काय?

  • स्कॉर्पिन पाणबुड्या अत्यंत शक्तिशाली असून त्यात प्रगत स्टेल्थ (गुप्त) वैशिष्ट्ये आहेत.
  • लांब पल्ल्याच्या मार्गदर्शित पाणसुरूंग तसेच जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी पाणबुडी सुसज्ज आहे.
  • पाणबुडीमध्ये अत्याधुनिक 'सोनार' आणि सेन्सर संच असल्याने त्यांच्यात उत्कृष्ट कार्यान्वयन क्षमता असते. तसेच प्रॉपल्शन मोटर म्हणून प्रगत परमनंट मॅग्नेटिक सिंक्रोनस मोटरदेखील आहे.

पाहा व्‍हिडिओ : हे आहे भारतातील पहिलं पाॅड हाॅटेल

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news