Pakistan | इम्रान खान यांच्यानंतर पीटीआय पक्षाच्या नेत्यांची धरपकड, माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना अटक

Pakistan | इम्रान खान यांच्यानंतर पीटीआय पक्षाच्या नेत्यांची धरपकड, माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना अटक

इस्लामाबाद : पुढारी ऑनलाईन; पाकिस्तानचे (Pakistan) माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे उपाध्यक्ष मखदूम शाह मेहमूद कुरेशी यांना गुरुवारी इस्लामाबाद पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आले आहे. "तेहरिक-ए-इन्साफचे (Tehreek-e-Insaf) उपाध्यक्ष मखदूम शाह मेहमूद कुरेशी यांना इस्लामाबाद पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यांना अज्ञात ठिकाणी नेण्यात आले आहे," अशी माहिती पीटीआय पक्षाने ट्विट करत दिली आहे. शाह महमूद कुरेशी हे इम्रान खान यांच्या विश्वासातील सर्वात महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत.

पाकिस्तानमधील The Express Tribune च्या वृत्तानुसार, बुधवारी दुपारी पोलिसांच्या अयशस्वी प्रयत्नानंतर पीटीआय पक्षाचे नेते शाह मेहमूद कुरेशी यांना इस्लामाबादमधील गिलगिट-बाल्टिस्तान हाऊसमधून ताब्यात घेण्यात आले. पंजाब आणि खैबर पख्तूनख्वामधील दंगली आणि जाळपोळ प्रकरणात कुरेशी हे पोलिसांना हवे होते.

अटक करण्यापूर्वी कुरेशी यांनी पीटीआय कार्यकर्त्यांना देशातील खर्‍या स्वातंत्र्यासाठी लढा सुरू ठेवण्याचे आवाहन केले. एका संदेशात त्यांनी म्हटले आहे की, आपण काहीही चुकीचे केले नसल्यामुळे आपल्याला कसलाही पश्चात्ताप नाही. पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या अटकेनंतर झालेल्या हिंसक आंदोलनात ५० जणांचा मृत्यू झाल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

पाकिस्तानात हिंसाचार, ८ ठार, १०० हून अधिक जखमी

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर (Imran Khan arrest) संपूर्ण पाकिस्तानात हिंसक निदर्शने सुरूच आहेत. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिंसाचारात आतापर्यंत किमान ८ लोक ठार आणि १०० हून अधिक जखमी झाले आहेत. खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या अनेक नेत्यांना अटक करण्यात आली. त्यात फवाद चौधरी आणि असद उमर यांचा समावेश आहे. इम्रान खान यांना मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली होती. त्यांना काल बुधवारी नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोच्या (एनएबी) ताब्यात देण्यात आले. अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात त्यांना आठ दिवस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Pakistan)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news