Video : पत्नीचा अपमान झाल्यामुळे एन. चंद्राबाबू ढसाढसा रडले

Video : पत्नीचा अपमान झाल्यामुळे एन. चंद्राबाबू ढसाढसा रडले

"चालू कार्यकाळात आपण विधानसभेत पाय ठेवणार नाही", अशी तेलगू देसमचे अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी शपथ घेतली. सत्तेवर असणाऱ्या वायएसआर काॅंग्रेस पक्षाच्या आमदारांनी माझा आणि माझ्या पत्नीचा अपमान केल्याच्या निषेधार्थ त्यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी ते भावूक झाल्याचा Video व्हायरल होत आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत महिला सक्षमीकरणावरील चर्चेत नायडू आणि त्यांच्या पत्नीविरोधात वायएसआरसीपी सदस्यांनी अपमानास्पद वक्तव्य केलं होतं, त्यामुळे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू म्हणाले की, "या घटनेनंतर मी विधानसभेत सहभागी होणार नाही. जेव्हा पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतरच सभागृहात परतेन."

मंगलगिरी येथील टीडीपीच्या राज्य मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत एन चंद्राबाबू नायडू यांनी अश्रू अनावर झाले आणि अक्षरशः ते ढसा-ढसा रडले. ते म्हणाले की, "मी सत्तेत असो की, सत्तेबाहेर. माझी पत्नी कधीही राजकारणात आली नाही. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिने मला प्रोत्साहन दिलेले आहे. तिने कधीही राजकारणात प्रवेश केला नाही. तरीही वायएसआरसीपीच्या सदस्यांनी माझ्या पत्नीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला."

"सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सत्ताधारी पक्षाते सदस्य जेव्हा माझ्या पत्नीसंदर्भात अपशब्द बोलत होते, तेव्हा अध्यक्ष केवळ बघत राहिले. राहिलेल्या वेळात विधानसभेपासून दूर राहण्याचा माझा निर्णय बोलू दिला नाही. मागील अडीच वर्षांपासून मी हा अपमान सहन करत आहे. पण, मी आता जनतेत जाऊ पाठिंबा मिळवणार आणि मुख्यमंत्री म्हणून जनतेचा जनादेश मिळाल्यानंतरत मी विधानसभेत पाय ठेवणार आहे", असंही त्यांनी पत्रकारांना सांगताना Video मध्ये दिसत आहेत.

हे वाचा…

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news