पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्रजी नववर्ष जानेवारी महिन्यापासून सुरू होते. तर मराठी नववर्ष चैत्र महिन्यापासून सुरू होते. हा सण आपण प्रत्येकाच्या दारात गुड्या उभारून गोड पदार्थाचे सेवन करून नववर्षाचे स्वागत करतो. यावेळी खास करून प्रत्येकाच्याच घरी गोड पदार्थ पाहाय़ला मिळतो, तो म्हणजे पुरण पोळी. यासाठी महिला वर्गाची खूपच धावपळ होते. पुरण पोळी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासोबत ते बवनण्यापर्यंत महिलांचा कस लागतो. मात्र, पुरण पोळ्या करताना चुकीचे पद्धत वापरल्यास पोळ्या फुटण्याचे प्रकार घडतात. यासाठी पोळ्या फुटू नयेत म्हणून महिलांसाठी काही खास सोप्या टिप्स जाणून घ्या.
१. पुरणाच्या पोळीच्या कणक मळताना पाण्यात विरघळलेली एक चमचा साखर मिक्स करावी. यामुळे पीठाला मऊपणा येतो आणि कणकेतून पुरण बाहेर पडत नाही.
२. एका मोठ्या पुरणातील तेल लावून कणीक ठेवावे. नंतर खलबत्याच्या बत्याने तार सुटेपर्यंत कणीक चेचावे.
३. कणीक मळताना दोन चमचे तेलाचा वापर करावा, यामुळे कणकेला मऊपणा येतो.
४. पुरण पोळी करताना सुरूवातील २ तास हरभरे डाळ चांगली मऊ होईपर्यंत भिजवावी.
५. पुरणात गुळ घालताना बारीक काप करून किंवा किसणीने किसून घालावे.
६. पुरणात गूळ समप्रमाणातच घालावा. कारण, जास्त गुळ घातल्यास पुरण कडक होते. कमी गुळ घातल्यास पोळ्या कमी गोड होतात.
७. सुंट, जायफळ, वेलदोडे या पदार्थ पुरणात घालावे. यामुळे पुरण पोळी खाल्याने शरीराला त्रास होत नाही.
८. मिक्सर किंवा पुरण वाटण्याच्या किसणीने पुरण वाटल्यास पुरणपोळ्या फुटत नाहीत.
९. हरभरे डाळ भिजवताना भांड्यात खाली एक चमचा तुप किंवा तेल घालावे. कारण डाळ एकमेकांना चिकटत नाही.
१०. डाळीत गुळ घातल्यानंतर पातळ झाल्यास हे मिश्रण सुती कपड्याने पिळून घ्यावे.
११. पुरणात गुळासोबत साखर घातल्यास चालते. मात्र, गॅसवर हे मिश्रण ठेवल्यावर जास्त पातळ किंवा घट्ट होणार नाही यांची काळजी घ्यावी.
१२. गॅसवरील तव्यावर पोळी किंवा पुरण लागून करपू नये म्हणून सारखे- सारखे पोळी परतत रहावे. (टिप- यावेळी तव्यावरील पोळी फाटणार नाही यांची काळजी घ्यावी.)
१३. पोळी करताना पुरण जास्त घट्ट झाल्यास त्यावर थोडा दुधाचा वापर केला तरी चालतो.
१४. पुरण पोळी लाटताना त्यातून पुरण बाहेर येवू नये म्हणून काळजी घ्यावी. (टिप- जर पोळी लाटताना चिकटले किंवा पुरण बाहेर आला तर त्यावर गव्हाचे पीठ घालून लाटावे.)
जर अशी काळजी घेतल्यास यंदाच्या मराठी नववर्षातील गुडी पाडव्याला तुमच्या पुरण पोळ्या फाटणार नाहीत.
अधिक वाचा-