End of the Year : नुकसान टाळा, वर्षअखेरीपूर्वी ‘हे’ कराच!

End of the Year : नुकसान टाळा, वर्षअखेरीपूर्वी ‘हे’ कराच!

वित्तीय व्यवहारांमध्ये आर्थिक वर्षाअखेर महत्त्वाची मानली जाते; परंतु शासन निर्णयांचा विचार करता यंदाच्या कॅलेंडरीय वर्षाची अखेर महत्त्वाची ठरणार आहे, कारण अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठीची मुदत 31 डिसेंबरपर्यंत संपत आहे. यामध्ये विलंबाने आयकर रिटर्न भरणे, डीमॅट आणि म्युच्युअल फंड खात्यात नॉमिनी जोडणे, बंद केलेला यूपीआय आयडी पुन्हा सुरू करणे आणि बँक लॉकरच्या नवीन करारावर स्वाक्षरी करणे, यांचा समावेश आहे. नवीन वर्षात पदार्पण करण्यापूर्वी काही महत्त्वाची कामे पूर्ण केल्यास नुकसान टाळता येईल. त्यांची तपशीलवार माहिती अशी. ( Five Things to do before the End of the Year )

End of the Year : आयकर विवरणपत्र

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयकर रिटर्न भरणे, कारण आर्थिक वर्ष 2022-23 साठी दंडासह विलंबित आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. आयकर कायद्याच्या कलम 234 एफअंतर्गत, देय तारखेपूर्वी रिटर्न न भरणार्‍या व्यक्तीवर कारवाई केली जाईल. उशिरा आयटीआर भरणार्‍यांना 5,000 रुपये दंड आकारला जाईल. मात्र, ज्यांचे एकूण उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना फक्त 1000 रुपये दंड भरावा लागेल. मात्र, 31 डिसेंबरनंतर त्यांना 5 हजार रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे.

बँक लॉकर असल्यास…

दुसरे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करणे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, सुधारित बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, जर बँक ग्राहक बँक लॉकर करारावर सही करू शकला नाही, तर त्याचे लॉकर गोठवले जाईल. ठइख ने बँक लॉकर करारासाठी नूतनीकरण प्रक्रिया अंतिम तारखेसह अनिवार्य केली आहे. 31 डिसेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी बँक लॉकर करार सादर केलेल्या खातेधारकांना सुधारित करारावर स्वाक्षरी करावी लागेल आणि ते त्यांच्या बँक शाखेत जमा करावे लागतील.

End of the Year : सिम कार्ड खरेदी

1 जानेवारी 2024 पासून नवीन सिम कार्ड खरेदीचे नियमही बदलतील. दूरसंचार विभागाच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांना आता पेपर आधारित प्रक्रियेद्वारे केवायसी सबमिट करावे लागेल. फक्त टेलिकॉम कंपन्या ई-केवायसी करतील. मात्र, नवीन मोबाईल कनेक्शन घेण्याचे उर्वरित नियम कायम राहणार आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.

डीमॅट खात्यांना नॉमिनी

'सेबी'ने 1 जानेवारी 2024 पर्यंत सर्व डीमॅट खातेधारकांना नामांकन दाखल करणे बंधनकारक केले आहे. खातेदार अयशस्वी झाल्यास, ते शेअर्समध्ये व्यवहार करू शकणार नाहीत. असे करण्याची अंतिम मुदत आधी 30 सप्टेंबर होती, ती तीन महिन्यांनी वाढवण्यात आली होती.

यूपीआय आयडी

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने पेमेंट अ‍ॅप्स (गुगल पे, पेटीएम, फोन पे) इत्यादींना एका वर्षापासून सक्रिय नसलेले यूपीआय आयडी बंद करण्यास सांगितले आहे. यूपीआयद्वारे पेमेंट करणार्‍या ग्राहकांना त्यांचा आयडी सक्रिय करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे.

आर्थिक शिस्तीमध्ये बचतीचे आणि खर्चाचे नियोजन महत्त्वाचे असते. या दोन्ही द़ृष्टिकोनातून सदरच्या मुदतीचे पालन करणे फायदेशीर ठरेल. ते न केल्यास आपल्याला दंडरूपी अधिक खर्च करावा लागेल. मुदतीपूर्वी या गोष्टींची पूर्तता केल्यास आपले नुकसान टळून बचत होईल.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news