दौंडमध्ये राष्टीयकृत बँकेत ५ कोटींचा ठेव घोटाळा

दौंडमध्ये राष्टीयकृत बँकेत ५ कोटींचा ठेव घोटाळा

यवत (पुणे), पुढारी वृत्तसेवा: दौंड शहर परिसरातील एका राष्ट्रीयीकृत बँकेत 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा ठेव घोटाळा झाला असून याची जोरदार चर्चा दौंड शहर आणि परिसरात रंगू लागली आहे.

याबाबत नागरिकांच्या माहितीनुसार, या राष्ट्रीयकृत बँकेत मुदत ठेवी असलेल्या रकमेच्या बनावट पावत्या तयार करण्यात आल्या असून मुदत ठेवीची रक्कम किती झाली आहे, ही चौकशी करण्यासाठी ठेवीदार गेल्यानंतर ही गोष्ट उघडकीस आली. स्थानिक कर्मचारी आणि अधिकारी यांच्या मदतीने हा घोटाळा करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. संबंधित प्रकरणाचे बँकेच्या वरिष्ठ कार्यालयात माहिती मिळाल्यानंतर तेथील अधिकारी येऊन या घोटाळ्याची माहिती घेत आहेत. या ठिकाणी बँकेत ठेवीदार यांनी नेमका काय प्रकार आहे, याबाबत विचारल्यानंतर घोटाळा झाला आहे. नेमका घोटाळा किती रुपयांचा आहे? ते तपासून मग कारवाई केली जाणार असल्याचे सांगितलं जात आहे. एकंदरीतच या घोटाळ्यामुळे परिसरातील नागरिकांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारण्यात आला असून राष्टीयकृत बँकाच्याविश्वासार्हतेबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news