न्यूझीलंडमध्ये बांगलादेशने ते केले जे भारत आणि पाकिस्तान करू शकले नाही

न्यूझीलंडमध्ये बांगलादेशने ते केले जे भारत आणि पाकिस्तान करू शकले नाही
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव करून इतिहास रचला आहे. ओव्हल येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशला 40 धावांचे लक्ष्य दिले होते. मोमिनुल हकच्या नेतृत्वाखालील बांगलादेश संघाने हे लक्ष्य २ गडी गमावून पूर्ण केले. कर्णधार मोमिनुल हक 13 आणि मुशफिकुर रहमान 5 धावांवर नाबाद राहिले. बांगलादेशचा न्यूझीलंडवर कोणत्याही फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडमधील पहिला विजय आहे. याशिवाय त्यांनी प्रथमच कसोटी सामन्यात किवी संघाचा पराभव केला. या ऐतिहासिक विजयासह बांगलादेशने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 मध्ये 12 गुण मिळवले आहेत. बांगलादेशने 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 328 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने 458 धावा केल्या आणि किवीजवर 130 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात बांगलादेशच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आणि संपूर्ण संघाला 169 धावांत गुंडाळले. बांगलादेशला 40 धावांचे लक्ष्य मिळाले, ते त्यांनी 2 गडी गमावून पूर्ण केले. बांगलादेशच्या विजयाचा हिरो ठरला इबादत हुसेन. त्याने किवी संघाच्या दुसऱ्या डावामध्ये46 धावांत 6 बळी घेतले. बांगलादेशने आतापर्यंत न्यूझीलंडमध्ये एकही विजय नोंदवला नव्हता. 2017 मध्ये 595/8 च्या प्रचंड धावसंख्येनंतरही ते न्यूझीलंडमधील कसोटी सामन्यांमध्ये जिंकण्याच्या जवळपासही पोहोचले नव्हते.

बांगलादेशचा SENA देशांमध्ये पहिला विजय

या सामन्यापूर्वी, बांगलादेशने सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये एकही विजय नोंदविला नव्हता. बांगलादेशने या देशांमध्ये चांगली कामगिरी केली, पण त्यांना कधीही विजय मिळवता आला नाही. ओव्हलच्या प्रत्येक सत्रात बांगलादेशने न्यूझीलंडचे वर्चस्व राखले.

तब्बल 9 वर्षांनंतर बांगलादेशच्या एका वेगवान गोलंदाजाने 5 बळी घेतले

2013 नंतर बांगलादेशच्या एकाही गोलंदाजाने कसोटी सामन्यात 5 बळी घेतलेले नाहीत. 9 वर्षांपूर्वी रुबीऊल इस्लामने झिम्बाब्वेमध्ये 5 विकेट घेतल्या होत्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news