Mumbai Fire | मुंबईतील आग्रीपाडा येथील इमारतीला आग, ५ मजल्यांना झळ

file photo
file photo

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील चिस्तिया पॅलेस इमारतीला आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ६ गाड्या आग विझवण्याचे काम करत आहेत. ही आग आज सकाळी साडेआठच्या सुमारास लागली असून त्यात इमारतीच्या तीन मजल्यांना झळ बसली आहे. (Mumbai Fire)

जहांगीर बोमन बेहराम मार्ग, आग्रीपाडा पोलिस स्टेशनजवळ, नाथानी हाइट्स समोर, चिस्तिया पॅलेस या २१ मजली इमारतीला सकाळी आठच्या सुमारास आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासह रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. इमारतीच्या इलेक्ट्रिक डक्टमधील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इंस्टॉलेशन्समध्ये आग लागल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात येत आहे. फिक्स्ड फायर फायटिंग सिस्टीमच्या लाइनसह अग्निशमन दलामार्फत इमारतीच्या ५, ६, ७, ८ आणि १५ व्या मजल्यावर आग विझवण्याचे काम सुरू आहे. ५ मोटर पंपांच्या २ लहान होज लाइन कार्यरत आहेत. सर्व मजल्यांवरील पायऱ्यांद्वारे जास्तीत जास्त रहिवाशांची सुरक्षितपणे सुटका केली जात आहे. अग्निशमन दलाने एक नंबर वर्दी दिली असून अद्यापपर्यंत जखमीची नोंद नाही.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news