Uttarkashi Tunnel Rescue | ऑगर मशीनचे तुटलेले ब्लेड बाहेर काढले, आता बचावकार्यात लष्कराची मदत

Uttarkashi Tunnel Rescue | ऑगर मशीनचे तुटलेले ब्लेड बाहेर काढले, आता बचावकार्यात लष्कराची मदत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरकाशीच्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांच्या बचावकार्यात अनेक प्रकारचे अडथळे येत आहेत. आज बचावकार्याचा १६ वा दिवस आहे. भारतीय लष्कराच्या अभियंता कॉर्प्सचा एक अभियंता गट आणि मद्रास सॅपर्सची एक तुकडी देखील बचाव कार्यात गुंतलेली आहे. मॅन्युअल ड्रिलिंगमध्ये लष्कराची ही तुकडी मदत करणार आहे. दरम्यान, बोगद्यामध्ये ऑगर मशीनचे तुटलेले ब्लेडचे भाग पाईपमधून बाहेर काढण्यात आले आहेत.

१२ नोव्हेंबरपासून बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. २१ नोव्हेंबरपासूनच सिल्कियारा बाजूकडून बोगद्यात आडवे खोदकाम सुरू होते. कामगारांपर्यंत पोहोचायला १० ते १२ मीटर अंतर बाकी होते. मात्र शुक्रवारी सायंकाळी ड्रिलिंग मशिनसमोर रॉड आल्याने ड्रिलिंग मशिनचा शाफ्ट त्यात अडकला होता. तो शनिवारी काढण्यात आला. मात्र ब्लेडचे तुकडे बोगद्यात अडकले होते. त्यामुळे डोंगरमाथ्यावरून ड्रिलिंगचा प्लॅन बी आखण्यात आला आणि त्यावर अंमलबजावणी सुरू झाली. सतलज विद्युत महामंडळाकडून रविवारी डोंगरमाथ्यावरून उभे खोदकाम सुरू करण्यात आले आहे. रविवारी जवळजवळ ३० मीटर पर्यंत खोदकाम केल्यानंतर आजही हे काम सुरू आहे.

दुसरीकडे अमेरिकन बनावटीचे ऑगर ड्रिलिंग मशीनचे तुटलेले भाग दुरुस्त करण्याचे काम सुरू असतानाच पुन्हा आडवे खोदकाम सुरू केले आहे. आज सकाळी ऑगर मशीनचे अडकलेले ब्लेडचे भाग कापून बाहेर काढण्यात आले. ४८ मीटर अडकलेल्या ऑगर मशीनचे ब्लेड आता पाईपमधून पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहेत. अशा कामांमध्ये पारंगत असलेली ११ लोकांची रॅट मायनर्सची एक टीम आता पाईपच्या आत पुढील १० मीटर मॅन्युअली ड्रिल करेल. आजपासून बोगद्याच्या आत मॅन्युअल ड्रिलिंगचे काम सुरू होऊ शकते. ही टीम ६ तास खणन करून दगड आणि धातूचे भाग कापून पाईपसाठी मार्ग रिकामा करेल. त्यानंतर ऑगर मशीन ८०० मिलीमीटर पाईप पुढे दाबेल. सुमारे १० मीटरचे अंतर पार करावे लागणार आहे. यासाठी मुंबईतील गटारांचे काम करणाऱ्या कामगारांचीही मदत घेतली जात असून, ते मलबा हटवून आत मार्ग तयार करणार आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news