मुंबई : भायखळा येथील ‘विठ्ठल निवास’ इमारतीला आग

मुंबई : भायखळा येथील ‘विठ्ठल निवास’ इमारतीला आग

मुंबई, पुढारी वृत्तसेवा :
भायखळा पश्चिमेकडील जेकब सर्कल येथे असलेल्या 'विठ्ठल निवास' या चार मजली इमारतीला बुधवारी (दि.२३) दुपारी १२.१५ च्या सुमाराास आग लागली . इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली असून तिचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही.

अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी तीन फायर इंजिन्स, ३ जम्बो टँकरसह घटनास्थळी पोहचले आहेत.     मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत कोणतीही जीवित हाणी  झालेली नसल्याचे नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या घटनेने मात्र सातरस्ता परिसरात काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news