पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने (CCI) मंगळवारी गुगलला ९३६.४४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. प्ले स्टोअरच्या धोरणांशी संबंधित अनुचित व्यापार पद्धतींसाठी हा दंड लावण्यात आला आहे. सीसीआयला असे आढळून आले की Google ने आपल्या वर्चस्वाचा गैरवापर केला आहे. नियामकाने कंपनीला अनुचित व्यवसाय पद्धती थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. सीसीआयने निवेदनात म्हटले आहे की त्यांनी गुगलला निर्धारित वेळेत त्यांचे वर्तन सुधारण्याचे निर्देश दिले आहेत. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत सीसीआयने गुगलविरुद्ध मोठा निर्णय घेण्याची ही दुसरी वेळ आहे. (Fine To Google)
यापूर्वी भारतीय स्पर्धा आयोगाने गुगलवर १३३७.७६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. अँड्रॉइड मोबाईल डिव्हाईस क्षेत्रातील बाजारपेठेतील मजबूत स्थानवर असलेल्याचा गैरफायदा घेतल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. (Fine To Google)
यासोबतच सीसीआयने आघाडीच्या इंटरनेट कंपनी असेल्या गुगलला अनुचित व्यावसायिक कारवाया थांबवण्याचे निर्देश दिले होते. सीसीआयने गुरुवारी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की Google ला आपल्या कार्यपद्धतीत काही ठराविक काळात सुधारणा करण्यासाठी संधी होती. या बाबत कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया (CCI) ने ट्विट केले की, "Android मोबाईल डिव्हाईस इकोसिस्टममधील ऐकपेक्षा अधिक मार्केटमधील स्थानाचा गैरवापर केल्याबद्दल Google ला दंड ठोठावण्यात आला आहे." (Fine To Google)
अधिक वाचा :