upcoming south movies :’पुष्पा-२’ ते प्रभासच्या ‘सालार’पर्यंत येताहेत साऊथचे ‘हे’ चित्रपट

upcoming south movies
upcoming south movies
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड चित्रपटांपेक्षा आजकाल साऊथचे अनेक चित्रपट हिट होत आहेत. साऊथच्या काही चित्रपटांना चाहत्यांनी अगदी डोक्यावर घेतले. तर काही चित्रपट फ्लॉफ देखील झाले; परंतु, बॉलिवूडच्या तुलनेत साऊथच्या काही चित्रपटांची कमाई भरघोष आहे. याच दरम्यान केजीएफ-२ (KGF -2) आणि आरआरआर (RRR) यासारखे चित्रपट हिट झाल्यानंतर आता साऊथच्या चित्रपटांची क्रेझ वाढली आहे. सध्या चाहत्यांच्या नजरा साऊथच्या आगामी चित्रपटावर खिळल्या आहेत. पाहूयात साऊथचे आगामी चित्रपट… ( upcoming south movies )

upcoming south movies : यशोदा

साऊथचा अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूच्या 'पुष्पा द राइज' या चित्रपट हिट झाल्यानंतर आगामी चित्रपट घेवून येत आहे. या साऊथ चित्रपटाचे नाव 'यशोदा' असे आहे. अभिनेत्री सामंथाचा 'यशोदा' हा चित्रपट १२ ऑगस्ट २०२२ ला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हरी आणि हरीश यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित हबोताच चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

upcoming south movies : सालार

बाहुबली चित्रपटानंतर साऊथ अभिनेता प्रभासचा आगामी 'सालार' चित्रपट घेवून येत आहे. या चित्रपटात प्रभाससोबत अभिनेत्री श्रुती हासन, दिशा पटानी आणि जगपती बाबू यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन  केजीएफ-२ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केलं आहे.  सालार चित्रपटात जबरदस्त ॲक्शन आणि थ्रीलर सीन असणार आहेत. यामुळे चाहत्याच्या उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, सालार चित्रपट २०२३ मध्ये रिलीज होणार आहे.

लाइगर

साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा यांचा आगामी 'लाइगर' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडासोबत बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे, माइक टायसन, राम्या कृष्णन, रोनित रॉय आणि मकरंद देशपांडे दिसणार आहेत. 'लाइगर' हा चित्रपट पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केला असून, धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनविण्यात आला आहे. हा चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत रिलीज होणार आहे. हा चित्रपट २५ ऑगस्ट २०२२ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडाची मुक्य भूमिका असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आदिपुरुष

दिग्दर्शक ओम राऊत आणि साऊथ स्टार प्रभासचा आगामी 'आदिपुरुष' हा चित्रपट येत आहे. हा चित्रपट पौराणिक रामायणाच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटात प्रभाससोबत बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन, सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात प्रभासने प्रभूरामची, क्रितीने सीता मातेची आणि सैफने रावणाची भूमिका साकरल्या आहेत. हा चित्रपट १२ जानेवारी २०२३ रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगु, तामिळ आणि कन्नड भाषेत येत आहे. हा चित्रपटाचे बजेट ५०० कोटींचे आहे.

पुष्पा: द रूल

साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनचा 'पुष्पा द राइज' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच 'पुष्पा: द रुल' चित्रपट पडद्यावर प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी २०२३ मध्ये चाहत्याच्या भेटीस येत आहे. अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, जगदीश, अजय घोष, सुनील आणि अनसूया यांनी चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे बजेट ४०० कोटींचे आहे. ( upcoming south movies )

प्रोजेक्ट के

साऊथ स्टार प्रभासचा आणखी एक दुसरा 'प्रोजेक्ट के' चित्रपट चाहत्याच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात प्रभाससोबत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन आणि दिशा पटानी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट तेलगू व्यतिरिक्त तमिळ, कन्नड आणि मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. परंतु, 'प्रोजेक्ट के' चित्रपटाची अद्याप प्रदर्शनाची तारिख ठरलेली नाही. प्रभासचे चित्रपट हिट होत असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आरसी १५

आरआरआर (RRR) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केल्यानंतर साऊथ अभिनेता राम चरण यांचा आगामी 'आरसी १५' या चित्रपटात येत आहे. या चित्रपटात रामचरणसोबत कियारा आडवानी, जयराम, नवीन चंद्रा, अंजली आणि सुनील यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून राम चरण आयएएस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या पोस्टरमधील राम चरण यांच्या लूकची जोरदार चर्चा झाली. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'आरसी १५' हा चित्रपट २०२३ च्या संक्रांतीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

विक्रांत रोणा

अनुप भंडारी दिग्दर्शित आगामी 'विक्रांत रोणा' हा चित्रपट २८ जुलै २०२२ रोजी चाहत्याच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात साऊथ स्टार किच्चा सुदीपसोबत बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत रिलीज होणार आहे. ( upcoming south movies )

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news