नगर : पाथर्डी नगरपालिकेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात | पुढारी

नगर : पाथर्डी नगरपालिकेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात

पाथर्डी शहर : पुढारी वृत्तसेवा : आगामी पालिका निवडणुकीसाठी शहरात इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी जोरात सुरू झाली आहे. मागील आठवड्यात पालिका आरक्षण सोडत झाली. आरक्षणामध्ये प्रभाग क्रमांक आठमध्ये अनुसूचित जातीसाठी जागा आरक्षित झाल्याने या जागेसाठी भारतीय जनता पार्टीकडून नितीन एडके यांच्यासह दिलीप मिसाळ, संतोष वाघमारे, संतोष उदमले, मनीषा उदमले आदी सर्व पक्षीय संभाव्य उमेदवारांनी संपर्क अभियान सुरू केले आहे.

सरकार स्थापनेसाठी भाजपकडून वेगाने हालचाली, फडणवीस दिल्लीला रवाना

या प्रभागातील आसरानगर येथील रहिवासी नितीन एडके यांनी आगामी पालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू करून प्रभागात संपर्कात भर दिला आहे. प्रभाग 8 मधील ब गटाची जागा अनुसूचित जातीच्या व्यक्तीसाठी राखीव झाल्याने आसरानगर हे याच प्रभागात आमदार मोनिका राजळे यांचे समर्थक नितीन एडके यांनी जोरदार संपर्क अभियान राबवत लोकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यास सुरुवात केली आहे.

एकनाथ शिंदे गुवाहाटीत पहिल्यांदाच मीडियासमोर, संपर्कातील आमदारांची नावे सांगा, ठाकरेंना दिले आव्हान

नगरपालिका निवडणुकीसाठीचे नुकतेच प्रभागांचे आरक्षण काढण्यात आले. यामध्ये प्रभाग 2 अ अनुसूचित जातिसाठी महिला राखीव झाल्याने नगरसेवक प्रवीण राजगुरू यांची अडचण झाली आहे. प्रभाग क्रमांक 8 हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने एडके यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

Anand Mahindra qualification : आनंद महिंद्रांना नेटकर्‍याने विचारलं, तुमचं शिक्षण किती? ; उत्तराने सर्वांची मने जिंकली

नगरपालिका निवडणूक ऑगस्ट अखेर अथवा सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. अपेक्षेप्रमाणे सध्या आमदार मोनिका राजळे यांच्याकडे उमेदवारी मागणार्‍यांची गर्दी झाली आहे. इच्छुकांनी आमदार राजळेंपुढे मिरवण्याची गेल्या काही दिवसांत एकही संधी सोडली नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीसह इतर पक्षांच्या गोटांमध्ये सध्या शांतता दिसून येत आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक निवडणुकांत महिलांसाठी राखीव होत असलेला प्रभाग यावेळी अनुसूचित जाती सर्वसाधारण झाल्याने एडके यांच्यासह इतरही इच्छुक पुरुष उमेदवारांना निवडणूक लढविण्यासाठी संधी मिळणार आहे.

Back to top button