विद्यार्थ्यांनो महत्त्वाची बातमी ! बारावीसाठी सोमवारपासून भरा अर्ज

विद्यार्थ्यांनो महत्त्वाची बातमी ! बारावीसाठी सोमवारपासून भरा अर्ज

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये होणार्‍या बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणार्‍या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज 'सरल डेटाबेस'वरून ऑनलाइन पद्धतीने संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रमुखांमार्फत भरण्यात येणार आहेत. परीक्षेसाठी 9 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा देण्यात आली असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.

उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयामार्फत सर्व शाखांचे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय, आयटीआयचे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्यात येणार आहेत. कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्र, कला आणि वाणिज्य शाखांसह व्यवसाय अभ्यासक्रम शाखांच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 9 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरदरम्यान करण्यात येणार आहे. परीक्षेचा ऑनलाइन अर्ज आणि अधिक माहिती राज्य मंडळाच्या  www. mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news