दोहा (कतार); वृत्तसंस्था : कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप (FIFA World Cup) मध्ये बुधवारी (दि.३०) 'क' गटात सौदी अरेबियाविरुद्ध मेक्सिकोचा रोमांचक सामना झाला. यामध्ये मेक्सिकोने सौदीवर विजय मिळवूनही एकप्रकारे पराभव पत्करला. म्हणजेच, मेक्सिकोने गटातील त्यांच्या शेवटच्या सामन्यात सौदी अरेबियाचा 2-1 असा पराभव केला, पण मेक्सिकोला गोल फरकामुळे प्री-क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवता आले नाही. (FIFA WC Saudi Arabia vs Mexico)
हेन्री मार्टिन आणि लुईस चॅव्ह्स या दोघांनीही मेक्सिकोचे विश्वचषकातील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी गोल केले, परंतु अर्जेंटिनाने पोलंडवर 2-0 असा विजय मिळाल्याने मेक्सिकोला अधिक फरकाने विजय मिळवणे गरजेचे होते. पण त्यांचा 2-1 असा विजय झाला जो पुरेसा नव्हता. १९७८ नंतर प्रथमच मेक्सिकोला प्रथमच असे अपयश पाहावे लागले असून गेल्या सात विश्वचषकांमध्ये मेक्सिकोने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.
दरम्यान, 'डी' ग्रुपमधील आणखी एका सामन्यात ऑस्ट्रेलियाने डेन्मार्कला एकमेव गोलने नमवले. हा महत्त्वाचा गोल त्यांच्या मॅथ्यू लेकी याने सामन्याच्या 60 व्या मिनिटाला केला. त्यामुळे आता 'ड' गटात डेन्मार्कचा संघ तळाला गेला आहे. त्यांना एकही सामना जिंकता आलेला नाही. (FIFA WC Australia Vs Denmark)
हे वाचलंत का?