दोहा (कतार); पुढारी ऑनलाईन : फिफा विश्वचषक २०२२ चे विजेतेपद जिंकण्यासाठी जगातील सर्वोत्तम ३२ संघ कतारमध्ये एकमेकांशी झुंजत आहेत. या विश्वचषकाच्या निमित्ताने ख्रिस्तीयानो पोर्तुगालचा रोनाल्डो, अर्जेंटिनाचा लियोनेल मेस्सी आणि ब्राझीलचा नेमार अशा जगविख्यात फूटबॉल पटूंची प्रतिष्ठा आपापल्या देशांच्या संघाकडून पणाला लागली आहे. विविध संघांच्या वाढत्या चाहत्यांचे मुख्य कारण हे स्टार खेळाडूच आहेत. पण जेव्हा वेगवेगळ्या संघांच्या सर्व खेळाडूंचे बाजारमूल्य जोडले गेले, तेव्हा पोर्तुगाल, अर्जेंटिना आणि ब्राझीलला मागे टाकून इंग्लंड सर्वात महागडा संघ ठरला आहे. (FIFA WC Football Teams Market Value)
थ्री लायन्स म्हणून ओळखला जाणारा इंग्लंडचा संघ गेल्या विश्वचषकात उपांत्य फेरीत पोहोचला होता आणि यावेळीही तो प्रमूख दावेदार म्हणून मैदानात उतरला आहे. ट्रान्सफर मार्केट वेबसाइटच्या डेटानुसार हॅरी केनच्या टीमचे बाजार मूल्य १.२६ अब्ज युरो आहे. हा आकडा ग्रेनेडासारख्या छोट्या देशांच्या जीडीपीएवढा आहे.
कतार विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांपैकी तीन लॅटिन अमेरिकन देशांचे संघ बाजार मूल्याच्या यादीत टॉप-१० मध्ये आहेत. ब्राझील संघ १.१ अब्ज युरोच्या बाजारमूल्यासह आघाडीवर आहे. अर्जेंटिनाचा संघ एकूण सातव्या तर लॅटिन संघांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ४५० मिलियन युरोचे बाजारमूल्य असलेला उरुग्वेचा संघ सर्वात महागड्या संघांच्या यादीत एकूण दहाव्या आणि लॅटिन देशांच्या गटात तिसऱ्या स्थानावर आहे.
संघ बाजार मूल्य (मिलियन युरो)