दोहा (कतार); वृत्तसंस्था : 'डी' ग्रुपमधील आणखी एका सामन्यात ऑस्ट्रेलियाने डेन्मार्कला एकमेव गोलने नमवले. हा महत्त्वाचा गोल त्यांच्या मॅथ्यू लेकी याने सामन्याच्या 60 व्या मिनिटाला लगावला. त्यामुळे आता 'ड' गटात डेन्मार्कचा संघ तळाला गेला आहे. त्यांना एकही सामना जिंकता आलेला नाही. (FIFA WC Australia Vs Denmark)
बुधवारच्या लढतीत डेन्मार्कने गोल लगावण्याचे अपारंपार प्रयत्न केले. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या अभेद्य बचावापुढे त्यांचा निभाव लागला नाही. एरव्ही हा संघ तगडा म्हणून ओळखला जातो. आजचा दिवसच त्यांचा नव्हता. गोल जाळ्याच्या दिशेने तब्बल तेरा फटके लगावूनही त्याचा काडीमात्र उपयोग झाला नाही. शिवाय सर्वाधिक काळ डेन्मार्कचाच चेंडूवर ताबा होता. केवळ एका संधीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विजय खेचून नेला. (FIFA WC Australia Vs Denmark)
आपल्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला फ्रान्सकडून सपाटून मार खावा लागला होता. तथापि, नंतरच्या दोन्ही लढतींत त्यांनी आपल्या खेळाचा दर्जा उंचावला आणि विजयाला गवसणी घातली.
अधिक वाचा :