आता ग्रामीण, अतिदुर्गम भागात वेगवान इंटरनेट : इस्रो-ह्युजेस आणि भारती एअरटेलची एकत्र सेवा

आता ग्रामीण, अतिदुर्गम भागात वेगवान इंटरनेट : इस्रो-ह्युजेस आणि भारती एअरटेलची एकत्र सेवा
Published on
Updated on

नवी दिल्ली; ऑनलाईन डेस्क : भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रो, ह्युजेस नेटवर्क सिस्टम आणि भारती एअरटेल यांनी एकत्र येत भारतात उपग्रहाच्या माध्यमातून इंटरनेट सेवा सुरू केली आहे. यासाठी इस्रोचे GSAT 11 आणि GSAT 29 हे उपग्रह वापरले जाणार आहेत. या तंत्रज्ञानामुळे देशातील अतिदुर्गम भागात तसेच ग्रामीण भाग, खेडी येथेही २ ते १० एमबीपीएस इतक्या वेगाचे इंटरनेट उपलब्ध होणार आहे, तर या तंत्रज्ञानाची क्षमता १०० एमबीपीएसची इतके वेगवान इंटरनेट जाणार आहे.

याबद्दल ह्युजेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजी चटर्जी म्हणाले, "देशातील दुर्गम भागात इंटरनेट पुरवणे हा आमचा उद्देश आहे. आम्ही ज्या मार्केटचा विचार करत आहोत त्यासाठी १० एमबीपीएस इतक्या वेगाचे इंटरनेट पुरसे आहे. अर्थात आमची क्षमता जास्त वेगवान इंटरनेट पुरवण्याची आहे, तशी मागणी आली तर ती आम्ही पूर्ण करू शकतो."

या सेवेची चाचणी जम्मू, काश्मीर, हिमाचल प्रदेश अशा पर्वतीय भागांत झालेली आहे. या तंत्रज्ञानाला High Throughput Satellite (HTS) म्हटले जाते. उपग्रह आणि ग्राऊंड स्टेशन यांच्यात जो डेटा ट्रान्सफर होतो, त्यासाठी लागणारा वेळ जास्त असतो, पण या तंत्रज्ञानामुळे डेटा ट्रान्सफरचा वेग वाढतो. ह्युजेस ही सेवा स्टेट बँक ऑफ इंडियाला देते. स्टेट बँक ऑफ इंडिया या माध्यमातून दुर्गम भागातील शाखांना इंटरनेट सुविधा देते. तसे रिलायन्स जिओही ह्युजेसकडून ही सेवा घेत असते.

हे वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news