Fashion Trend in Sari : पट्टेरी साडीची बॉलिवूड अभिनेत्रींमध्येही क्रेझ; तुम्हीही ट्राय करा

Fashion Trend in Sari - File Photo
Fashion Trend in Sari - File Photo

पुढारी ऑनलाइन डेस्क : Fashion Trend in Sari : भारतीय पेहारावातील साडीची शान काही वेगळीच आहे. मुख्य म्हणजे साडी नेसणे कधीही आऊट ऑफ फॅशन नाही. फक्त साडीचे ट्रेंडस् बदलताना पाहायला मिळतात. हल्ली साड्यांमध्ये स्ट्राईप्सची फॅशन आली आहे. बॉलीवूडमधील अभिनेत्रीसुद्धा स्ट्राईप्ड प्रिंटच्या साड्या वापरतात. या फॅशनची एक सकारात्मक बाजू म्हणजे या साड्या नेसल्यास स्लीम लूक मिळतो. प्रसंगानुरूप किंवा कार्यक्रमानुरूप आपल्या आवडीनुसार ही साडी वापरू शकता. ग्रेसफुल दिसण्यासाठी या साड्या नक्कीच चांगला पर्याय आहेत.

डिझाईन, रंग आणि वैविध्य : हल्ली साड्यांमध्ये अनेक प्रकारच्या स्ट्राईप्स प्रिंटस् आल्या आहेत. काही साड्या अशाही असतात की, त्यामध्ये साडीच्या दर्शनी भागावर स्ट्राईप्स असतात; पण पदर साधा, विनापट्ट्यांचा असतो. शरीर ठेवणीवर कोणत्या प्रकारच्या स्ट्राईप्स चांगल्या दिसतील त्यानुसार साडीची खरेदी करा. रंगाबाबत बोलायचे, तर उठावदार रंगांची सध्या चलती आहे. त्यामुळे हिरवा, निळा, पिवळा यासारखे रंग निवडू शकता.

Fashion Trend in Sari : विविध प्रकारचे कापड

पट्टेरी साड्या विविध फॅब्रिकमध्ये मिळतात. पूर्वी काही विशिष्ट कापडावरच पट्ट्या-पट्ट्यांचे डिझाईन असायचे. आकर्षक लूक मिळवण्यासाठी सुती, लिननच्या साड्या चांगला पर्याय ठरतो. लग्नादी समारंभाकरिता स्ट्राईप्स प्रिंटच्या साड्या वापरायच्या असतील, तर सिल्कमध्ये असे प्रिंट मिळतात. या साड्यांमुळे सण-समारंभात थोडा वेगळा लूक मिळेल.

Fashion Trend in Sari : प्रत्येक वयाला साजेशी

स्ट्राईप्स असलेल्या साड्यांची खासियत म्हणजे त्या कोणत्याही वयाच्या मुलींना, स्त्रियांना चांगल्या दिसतात. मात्र, या साड्या नेसून वावरताना काही गोष्टींबाबत सजग राहा. मध्यमवयीन असाल तर स्ट्राईप प्रिंटबरोबर पूर्ण बाह्यांचा ब्लाऊज घाला. याउलट तरुणींनी बिनबाह्यांचा अर्थात स्लिव्हलेस ब्लाऊज वापरावा.

हेही लक्षात ठेवा

  • स्ट्राईप्ड प्रिंट साडीबरोबर प्रिंटेड ब्लाऊज वापरणे योग्य नाही. त्यामुळे साडीची आणि आपली शान कमी होते. अशा साडीबरोबर ब्लॉकप्रिंट ब्लाऊज वापरू शकता. साडी एकाच रंगाची असेल, तर स्ट्राईप्ड प्रिंटच्या ब्लाऊजबरोबर थोडा वेगळा स्टाईलिश लूक दिसतो.
  • अ‍ॅक्सेसरीज कोणत्या घालायचा असा प्रश्न असेल तर स्ट्राईप प्रिंट साड्यांवर दागिने किंवा अ‍ॅक्सेसरीज या कमी प्रमाणातच वापरल्या पाहिजेत. स्ट्राईप प्रिंटच्या साड्या मुळातच
  • व्यक्तिमत्त्व छान बनवतात, त्यामुळे भरपूर दागिने घालण्याची गरजच नाही.
  • स्ट्राईप प्रिंट साडीवर प्लेन हँडबॅग घ्यावी, त्यामुळे आपला लूक उठून दिसेल.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news