3D Dress Fashion : 'थ्री डी' ड्रेस कधी घातला आहे का? जाणून घ्या लेटेस्ट फॅशन | पुढारी

3D Dress Fashion : 'थ्री डी' ड्रेस कधी घातला आहे का? जाणून घ्या लेटेस्ट फॅशन

3D Dress Fashion : सध्या मोबाईलपासून चित्रपटापर्यत थ्री-डी इफेक्टसचा वापर होत आहे. मग, फॅशन डिझायनर तरी त्यापासून लांब कसे राहणार? त्यामुळे आज बाजारात थ्री डी इफेक्टसचे अनेक ड्रेस आल्याचे दिसते.

सध्याच्या काळात फॅशनविश्वात थ्री – डी ड्रेसेसची चलती आहे. डिझायनर या ड्रेसेसमध्ये थ्री डी इफेक्टचा वापर करत आहेत. आपणही थ्री-डी टच वापरू इच्छित असाल तर हे ड्रेसेस ट्राय करू शकता. दिसतात. आजकाल मोबाईलपासून चित्रपटांपर्यंत थ्री-डी इफेक्ट खूप दिसतो. मग त्यापासून फॅशन डिझायनर तरी बाजूला कसे राहणार? त्यामुळे अलीकडे फॅशनविश्वात थ्री-डी ड्रेसेसची चलती आहे. त्यामध्ये हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. यामध्ये कलर्स, डिझाईन आणि स्टाईल यांना बॅलन्स करून ड्रेस सजवला जातो.

वेगवेगळ्या प्रसंगानुरूप हे ड्रेस बनवण्यात आले आहेत. या ड्रेसमध्ये आपल्याकडे हेवी थ्री-डी इफेक्ट किंवा लाईट थ्री डी इफेक्ट यासारखे दोन पर्याय असतात. यासंदर्भात डिझायनर अखिल भार्गव म्हणतात, प्री-डी ड्रेसेस लाईटनुसार रंग बदलतात. आपण रॅम्प किंवा डान्स फ्लोअरवर हे ड्रेसेस कॅरी केलेत तर आपल्या ड्रेसचे रंग बदलत जातील. या टेक्नॉलॉजीमध्ये प्लास्टिकच्या कोटिंगचा वापर केला जातो. यामुळे कपडे जास्त नॅचरल आणि डिजिटल प्रिंट जास्त सुंदर दिसतात. त्यासाठी आपण पार्टीला जात असाल तर प्लास्टिक कोटिंगचे हे ड्रेस ट्राय करू शकता. कॅज्युअल कार्यक्रम असेल तर त्यासाठी लाईट थ्री-डी इफेक्टवाला ड्रेस जास्त चांगला ठरेल.

एका डिझायनरच्या म्हणण्यानुसार ट्रेडिशनल ड्रेसेसवर थ्री डी इफेक्ट जास्त शोभून दिसतो. साडीची बॉर्डर आणि पदरावर ज्यावेळी थ्री डी एफेक्टचा वापर केला जातो त्यावेळी ती अधिक चांगली दिसते. आपणही थ्री-डी फैशन ट्राय करू इच्छित असाल तर मार्केटमध्ये अनेक डिझाईन्स उपलब्ध आहेत. शिवाय आपण आपल्या पसंतीचे डिझाईनही बनवून घेऊ शकता. आपण फ्लॉवर प्रिंटस् आणि चेक्सवर थ्री डी इफेक्ट ट्राय करू शकता.

अशा प्रकारचे डिझाईन बनवण्यासाठी किमान एक आठवडा लागतो. हा लेटेस्ट ट्रेंड असल्याने त्यासाठी तुम्हाला थोडे जास्त पैसे खर्च करावे लागतील. यामध्ये परफेक्ट लूकसाठी थ्री-डी इफेक्टवाली ज्वेलरी वापरली जाते. याबरोबर वापरण्यात येणारी ज्वेलरी एम्ब्रॉयडरीमध्ये वापरल्या जाणाया धाग्यांपासून बनवली जाते. त्यामुळे ती परफेक्ट मॅच होते.

हेही वाचा : 

Back to top button