Mika Singh : अखेर सापडली आकांक्षा पुरी; नेटकऱ्यांना रूजलंच नाही

Mika Singh
Mika Singh

पुढारी ऑनलाईन न्यूज; बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंह (Mika Singh)ने १०० ते १५० मुलींच्या स्वयंवरातून एकीची निवड करत अखेर विवाह बंधनात अडकला. मिका सिंहने त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री आकांक्षा पुरीसोबत लग्नगाठ बांधली आहे. या विवाह सोहळ्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर चाहत्यांनी त्याच्यावर कॉमेंन्टस करत मिकाला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.

गायक मिका सिंह आणि आकांक्षा पुरीसोबतचे एक फोटो आणि व्हिडिओ नुकतेच सोशल माडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोत मिका सिंह ब्लॅक रंगाच्या सूटमध्ये हटके दिसला. तर आकांक्षा पुरी गुलाबी रंगाच्या बॅकलेस शॉर्ट ड्रेसमध्ये स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसत होती. हा व्हिडिओ दोघांची जोडी खूपच क्यूट दिसली. याच दरम्यान शेअर झालेल्या एका फोटोत दोघा कपलच्या गळ्यात वरमाला परिधान केल्याचे दिसतेय. याच दरम्यान मिका सिंह फोटोला पोझ देताना आकांक्षाच्या शेजारी उभा असल्याचे दिसतो. यानंतर मात्र, तो लगेच बाजूला जातो आणि आकांक्षा एकटीच पाठीमागे राहताना व्हिडिओत दिसते. या घटनेवरून चाहत्यांनी दोघांच्याबद्दल अनेक तर्क- वितर्क लावण्यास सुरूवात केली आहे.

मिका आणि आकाक्षाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस करत आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात काही नेटकऱ्यांना दोघांची जोडी आवडल्याने त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांना हे कपल पसंतीस उतरले नाही म्हणून ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. यात एका युजर्सने 'मिकाचा लग्न करण्याचा निर्णय पूर्वनियोजित होता', 'हा शो स्क्रिप्टेड आहे', 'ही जोडी चांगली दिसत नाही'. तर दुसऱ्या एका युजर्सने 'हे कपल लग्न करणार नाहीत', 'एकदम बेकार जोडी', 'त्यांच्यामध्ये कोणतीही केमिस्ट्री दिसत नाही', 'दोघांकडे पाहून कपल असल्याचे वाटत नाही' असे म्हणत ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.

मिका सिंह आणि आकांक्षा पुरी गेल्या १०-१२ वर्षांपासून एकमेकांचे खास मित्र आहेत. मध्यंतरी दोघांच्या अफेअरच्या वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर मिकाच्या स्वयंवरमध्ये आकांक्षा पुरीची वाईल्ड कार्ड एट्री होणे आणि शोची विजेती बनणे हे काही नेटकऱ्यांना रूजले नाही. यामुळे मिका सिंहला नेटकऱ्याच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news