परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर उद्यापासून सायप्रस, ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर

एस. जयशंकर
एस. जयशंकर
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे 29 डिसेंबरपासून सायप्रस आणि ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर राहणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून बुधवारी देण्यात आली आहे. 29 ते 31 डिसेंबर या कालावधीत जयशंकर सायप्रसमध्ये विविध कार्यक्रमांत सहभाग घेणार आहेत.

भारत आणि सायप्रस यांच्यातील दि्वपक्षीय संबंधांना 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचे औचित्य साधत जयशंकर हे सायप्रसचा दौरा करणार आहेत. सायप्रसचे परराष्ट्र मंत्री इओनिस कसौलि्डस, तेथील हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हच्या अध्यक्षा अनिता डेमेट्रो यांच्याशी जयशंकर विविध मुद्यांवर चर्चा करणार आहेत. सायप्रसमधील गुंतवणूकदार आणि उद्योगपतीं यांच्याशीही ते संवाद साधणार आहेत. याशिवाय त्या देशात स्थायिक झालेल्या भारतीय नागरिकांची ते भेट घेणार आहेत. जयशंकर हे 1 ते 3 जानेवारी या कालावधीत ऑस्ट्रियाला भेट देणार आहेत.

               हेही वाचलंत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news