निसर्ग संवर्धनासाठी धडपडणाऱ्या धर्मराज पाटील यांचे निधन

धर्मराज पाटील
धर्मराज पाटील

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पक्षी संशोधन व निसर्ग संवर्धनासाठी धडपडणारा युवा कार्यकर्ता धर्मराज पाटील याचे मंगळवारी दुपारी 12 वाजता दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. गेले काही दिवस त्याची अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज सुरू होती.

राहत्या घरी त्याच्या मेंदूला आघात बसला (ब्रेन स्ट्रोक). तो एकटाच राहत असल्याने यासंदर्भात कोणालाच लवकर काही कळले नाही, त्यामुळे त्याला रात्रभर वैद्यकीय मदत मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी त्याच्या कंपनीतील लोकांनी तो फोन का उचलत नाही म्हणून घरी जाऊन दार तोडले, तेव्हा झालेला प्रकार उघडकीस आला.

त्याला तातडीने दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तो दाखल झाल्यापासून कोमातच होता. आज दुपारी ही लढाई संपली. पर्यावरणाच्या लढाईतील एक खंदा कार्यकर्ता यानिमित्ताने आपण गमावला. 'जीविधा'च्या अनेक उपक्रमात तो तज्ज्ञ म्हणून सहभागी झाला होता. कट्यावर त्याने अनेक लेक्चर घेतली, 'online course' मधे मार्गदर्शन केले, लिटील रण ऑफ कच्छ येथे on field Ornithology course त्याच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला. तो मुळा – मुठा संगमावरचे सालीम अली पक्षी अभयारण्य वाचवण्यासाठी आंदोलन करत होता. त्याने दुर्मिळ वनपिंगळ्याचे आधिवास शोधून काढले होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news