चेन्‍नईनजीक ‘फिल्‍मीस्‍टाईल’ थरार, चकमकीत दोन कुख्‍यात गुन्‍हेगार ठार

चकमकीत ठार झालेले कुख्‍यात गुंड रमेश (डावीकडे ), आणि  छोटा विनोथ.
चकमकीत ठार झालेले कुख्‍यात गुंड रमेश (डावीकडे ), आणि छोटा विनोथ.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चेन्‍नईजवळील गुडुवनचेरी येथे आज ( दि.१) पहाटे झालेल्या चकमकीत दोन कुख्‍यात गुन्‍हेगार ठार झाले. ( Encounter near Chennai ) रमेश आणि छोटा विनोथ अशी त्‍यांची नावे असून खून, दरोडासह अनेक गंभीर गुन्‍हे दोघांविरोधात दाखल झाल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.

Encounter near Chennai : गुडुवनचेरी फिल्‍मीस्‍टाईल थरार…

गुडुवनचेरी येथे पोलीस निरीक्षक मुरुगेसन यांच्या नेतृत्वाखालील पथक वाहन तपासणी करत होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास काळ्या रंगाच्या कारने पोलीस उपनिरीक्षक शिवगुरुनाथन यांना धडक देण्याचा प्रयत्न केला. शिवगुरुनाथन हे थोडक्‍यात बचावले. कारने पोलिस जीपला धडक दिली. कारमध्‍ये असलेल्‍या चौघांनी विळा घेवून पोलिसांवर हल्‍ला केला. शिवगुरुनाथन यांच्‍या डाव्‍या हाताला गंभीर दुखापत झाली. ते खाली पडले. त्‍यांच्‍यावर गुंडांनी पुन्‍हा हल्‍ला करण्‍यचा प्रयत्‍न केला असताना शिवगुरुनाथन आणि मुरुगेसन यांनी गुंडावर गोळीबार केला. यामध्‍ये रमेश ( वय ३५) आणि छोटा विनोथ (३२) हे गंभीर जखमी झाले. त्‍यांना तत्‍काळा चेंगलपट्टूच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्‍यात आले. येते उपचारापूर्वीच त्‍यांचा मृत्‍यू झाल्‍याचे पोलिसांनी सांगितले.

छोटा विनोथ यांच्‍यावर ५० हून अधिक गुन्हे दाखल होत. यामध्‍ये १६ खून, १० हत्येचा प्रयत्न, १० दरोडे आणि १५ गुंडगिरीचे गुन्हे दाखल आहेत. तर रमेश याच्‍यावर २० हून अधिक गुन्हे दाखल होते. यामध्‍ये ६ खून, ७ खुनाचा प्रयत्न आणि आठ गुंडगिरीचे गुन्हे दाखल होते. चकमकीनंतर घटनास्थळावरून पसार झालेल्‍या दोन गुन्हेगारांचा पोलीस शोध घेत आहेत.उपनिरीक्षक शिवगुरुनाथन यांना उपचारासाठी क्रोमपेटच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news