Elon Musk : एक्स बॉयफ्रेंड एलॉन मस्कने ट्विटर विकत घेताच अंबर हर्डने उचलले मोठे पाऊल!

Elon Musk
Elon Musk
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर अनेक ट्विटरला बाय बाय करत आपले अकौंट डीलीट करत आहेत. दरम्यान, आता ट्विटरवरील लोकांना एलॉन मस्कची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंबर हर्डचे ट्विटर अकाउंट सर्च केले तरी सापडत नाहीय. नेटकरी अंबरचे ट्विटर अकौंट शोधत आहेत, पण त्यांना अपयश येत आहे. एलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यानंतर अंबरने हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोडल्याची चर्चा रंगली आहे.

काही महिन्यांपूर्वी एलॉन मस्कने ट्विटरला 44 अब्ज डॉलर्स खर्चून विकत घेतले. ट्विटर विकत घेतल्यानंतर एलॉन मस्कने कंपनीत खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया साइट ट्विटरमध्ये मोठे बदल जाहीर केले असून कंपनीमध्येही अनेक मोठे निर्णय घेत सर्वांना धक्के दिले आहेत. त्याने ब्लू टिक (व्हेरिफाईड अकाउंट) साठी फी देखील जाहीर केली आहे. (Elon Musk)

रिपोर्ट्सनुसार, YouTuber मॅथ्यू लुईस यांनी सर्वप्रथम ट्विटरवरून अंबर हर्डचे अकौंट गायब झाल्याची माहिती दिली. त्याने बुधवारी ट्विट केले की, "अंबर हर्डने तिचे ट्विटर अकौंट डिलीट केले आहे. त्याने एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला ज्यामध्ये "हे खाते अस्तित्वात नाही" असा मॅसेज लिहिला आहे.

अंबरने अकौंट का बंद केले?

अंबर हर्डने तिचे ट्विटर अकौंट का बंद केले किंवा तिचे खाते का बंद झाले याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, ट्विटरवरून ती अशा प्रकारे गायब झाल्याबद्दल यूजर्सकडून सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक एलॉन मस्कमुळे अंबरने तिचे ट्विटर अकाउंट डिलीट केल्याचे कारण मानत आहेत. मात्र, याप्रकरणी अंबरच्या बाजूने कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

2016 मध्ये हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपपासून विभक्त झाल्यानंतर अंबर हर्डने उद्योगपती एलॉन मस्कला डेट करण्यास सुरुवात केली. अंबर आणि जॉनी 2010 मध्ये भेटले होते आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर 2015 मध्ये दोन्ही स्टार्सनी एकमेकांसोबत लग्न केले. मात्र, हे लग्न केवळ एक वर्ष टिकले आणि दोघेही विभक्त झाले. यानंतरच मस्क आणि अंबर जवळ आले, पण दोघे केवळ एक वर्ष एकत्र राहिले. नंतर ते एकमेकांच्या दूर गेले. यानंतर 2018 मध्ये दोघे पुन्हा एकत्र येणार असल्याची बरीच चर्चा झाली, मात्र काही महिन्यांतच हे नाते पुन्हा तुटले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news