राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर

राज्यसभेच्या 57 जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान घेतले जाणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गुरुवारी देण्यात आली.
राज्यसभेच्या 57 जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान घेतले जाणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गुरुवारी देण्यात आली.

पुढारी ऑनलाईन : 
महाराष्ट्रातील  राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या ६ जागांसाठी १० जूनला मतदान होणार आहे. निवडणूकीसाठी उमेदवारांना ३१ मे पर्यंत अर्ज करता येणार आहे.

शिवसेनेचे  संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल,  काँग्रेसचे पी. चिदंबरम, भाजपचे विनय सहस्त्रबुद्धे, पीयुष गोयल आणि विकास महात्मे यांचा राज्यसभा खासदार म्हणून कार्यकाल संपत आहे. तसेच जुलैमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार असल्याने त्यापूर्वी  राज्य सभा निवडणूक  होणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.  महाराष्ट्रातील या ६ जागंवर या खासदारांपैकी पुन्हा राज्यसभेवर कोण निवडून येणार की याठीकाणी नवीन चेहरे दिसणार याची जनतेत उत्सुकता आहे.

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news