बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच, गुरुपौर्णिमेनिमित्त एकनाथ शिंदेंचे ट्विट

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक नवे ट्विट केले आहे. "बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही….गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन…" असे एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो पोस्ट करत त्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त अभिवादन केले आहे.

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतर पहिल्यादांच मुख्यमंत्री दालनात स्वर्गीय आनंद दिघे यांचा फोटो (छायाचित्र) लावण्यात आला होता. मुख्यमंत्री दालनात बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोसोबत धर्मवीर आनंद दिघे यांचाही फोटो लावण्यात आला आहे.

"आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही," अशी ग्वाही याआधीही एकनाथ शिंदे यांनी दिली होती. आता नवं एक ट्विट करत पुन्हा एकदा याच गोष्टींचा पुनरुच्चार केला आहे.

मागील अडीच वर्षात शिवसैनिकांनी खूप काही भोगलं. त्यांचे खच्चीकरण करण्यात आले. मात्र, आता या राज्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे. एकाही शिवसैनिकाचा बालबाका करून देणार नाही. शिवसैनिकांच्या वाट्याला कोणी आलं, तर आम्ही सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (दि.१२) दिला होता. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहासमोर समर्थकांसह शक्तिप्रदर्शन केले. यावेळी शिंदे यांनी संबोधित केले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news