Eid in Afghanistan : तालिबानचा नवा फतवा; ईदच्या उत्सवात महिलांना सहभागी होण्यास बंदी

Eid in Afghanistan : तालिबानचा नवा फतवा; ईदच्या उत्सवात महिलांना सहभागी होण्यास बंदी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: जगभरात शनिवारी (दि.२२) ठिकठिकाणी ईदचा सण साजरा केला. दरम्यान, तालिबान प्रशासनाने महिलांविरोधात आणखी एक फतवा काढला आहे. अफगाणिस्तानातील तालिबानच्या नियंत्रणाखालील दोन प्रांतांमध्ये महिलांवर आणखी एक बंदी लागू करण्यात आली. तालिबान प्रशासनाने बागलान आणि तखार प्रांतातील महिलांना ईद-उल-फित्रच्या दिवशी घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या होत्या. महिलांना ईदच्या उत्सवात सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली. वाचा सविस्तर माहिती. (Eid in Afghanistan)

Eid in Afghanistan: ईदच्या उत्सवात सहभागी होण्यास बंदी

एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, तालिबान प्रशासनाने बागलान आणि तखार प्रांतातील महिलांना ईद-उल-फित्रच्या दिवशी घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या होत्या. महिलांना ईदच्या उत्सवात सहभागी होण्यास बंदी घालण्यात आलेली. आतापर्यंत फक्त या दोन प्रांतानाच ईद-उल-फित्रच्या दिवशी घराबाहेर न पडण्यास सांगण्यात आले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, अफगाणिस्तानच्या हेरात प्रदेशातील तालिबान अधिकार्‍यांनी कुटुंबे आणि महिलांना बागेत आणि बाहेरील आस्थापनांमध्ये खाण्यास मनाई केली होती. अधिकार्‍यांनी सांगितले की बंदी घालण्याचे कारण भिन्न लिंगाच्या व्यक्तींनी एकत्र येऊ नये आणि हिजाब न घालणे हे आहे.

महिलांवर सतत बंधने

जगभरातून मोठ्या प्रमाणावर निषेध होत असतानाही तालिबान आपल्या महिलाविरोधी निर्णयांपासून मागे हटत नाही. सहाव्या इयत्तेनंतर मुलींच्या उच्च शिक्षणावर बंदी आहे, याशिवाय संयुक्त राष्ट्रांसाठी काम करणाऱ्या महिलांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. अशी बरीच बंधने आणि नियम आहेत जे महिलांच्या जगण्यावर निर्बंध आणत आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news