पुढारी ऑनलाइन डेस्क : Amritpal Singh Arrested : 'वारिस पंजाब दे' चा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंहला पंजाबच्या मोगा पोलिसांनी अटक केली आहे. मोगा येथील एका गुरुद्वारातून त्याला अटक करण्यात आली. अमृतपालने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. दरम्यान, अमृतपालला अटक केल्यानंतर त्याला आसामच्या डिब्रुगढ तुरुंगात पाठवण्याचा येणार आहे, अशी माहिती आहे.
अमृतपालला मोगाच्या रोडेवाल गुरुद्वारा येथून अटक करण्यात आली. या गुरुद्वारातील सिंह साहिब ज्ञानी जसबीर सिंह रोडे यांनी अमृतालच्या अटकेचा घटनाक्रम एका व्हिजिओत सांगितला आहे. एएनआयने याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. पाहा व्हिडिओ
अमृतपालच्या अटकेनंतर आप नेता सौरभ भारद्वाजने प्रतिक्रिया दिली आहे. भारद्वाज म्हणाले, अमृतपालवर कायदेशीर कारवाई करून अटक करून शिक्षा द्यावाी, असे भगवंत मान सरकारचे म्हणणे होते. त्यानंतर त्यांनी पंजाब पोलिसांना आरोपीला अटक केल्याप्रकरणी अभिनंदन केले. या प्रकरणात सर्व सरकारांचे चांगले सहकार्य होते, त्यामुळे ही अटक झाली आहे.
हे ही वाचा :