पंजाब विधानसभा निवडणूक पुढे ढकलली, आता २०फेब्रुवारी रोजी होणार मतदान

पंजाब विधानसभा निवडणूक पुढे ढकलली, आता २०फेब्रुवारी रोजी होणार मतदान

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
पंजाब विधानसभेसाठी होणार्‍या मतदान तारखेत बदल करण्‍यात आला आहे. राज्‍यात आता १४ फेब्रुवारीऐवजी  २० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

संत गुरु रवीदास जयंती १४ फेब्रुवारी रोजी आहे. या जयंती निमित्त पंजाबमधून लाखो भाविक उत्तर प्रदेशमधील वाराणसीला जातात. त्‍यामुळे मतदान तारखेत बदल करण्‍यात यावा, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली होती. या मागणी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने बैठक घेतली. यावेळी राजकीय पक्षांनी केलेली  मागणी मान्‍य करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. त्‍यानुसा आता राज्‍यात आता १४ फेब्रुवारीऐवजी २० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news