पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दशकांमध्ये भारतात भूकंपाचे प्रमाण वाढत आहे. तर काही हवामान शास्त्रज्ञ आणि भूवैज्ञानिक तज्ज्ञांनी असा इशारा दिला आहे की, येत्या काळात भारतात भूकंपाच्या घटना वाढणार आहेत. जाणून घ्या कोणत्या विभातील शहरांना सर्वाधिक भूकंपाचा धोका आहे. (Earthquake)
तज्ज्ञांच्या मते, भूकंपाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे टेक्टोनिक प्लेट्सच्या स्थितीत बदल होणे. पृथ्वीवर १२ टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स एकमेकांवर आदळल्यावर बाहेर पडणाऱ्या ऊर्जेला भूकंप म्हणतात. या प्लेट्स अतिशय संथ गतीने फिरतात आणि दरवर्षी ४ ते ५ मिमीने त्यांच्या ठिकाणाहून सरकतात. अशा स्थितीत एक प्लेट दुसऱ्यापासून दूर जाते आणि दुसरी प्लेट दुसऱ्याच्या खाली सरकते. या प्रक्रियेदरम्यान, प्लेट्सच्या टक्करमुळे भूकंप होतो. (Earthquake)
गेल्या काही दशकांपासून भारत हा भूकंपाचा केंद्रबिंदू बनत चालला आहे. देशात सर्वत्र भूकंपाचा धोका वेगवेगळा आहे आणि या धोक्यानुसार देशाची अनेक झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये झोन-१, झोन-२, झोन-३, झोन-४ आणि झोन-५ यांचा समावेश आहे. झोन-२ म्हणजे सर्वात कमी धोका असलेला आणि भूकंपाच्या दृष्टीने सर्वात धोकादायक क्षेत्र झोन-५ आहे.
भारतात विभाग (क्षेत्र ५) अर्थात संपूर्ण ईशान्य भारत, जम्मू आणि काश्मीरचा काही भाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरातमधील कच्छचे रण, उत्तर बिहारचा काही भाग आणि अंदमान निकोबार बेटांचा समावेश होतो. या भागात वारंवार भूकंप होत असतात. तर क्षेत्र -४ मध्ये जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेशचा उर्वरित भाग, दिल्ली, सिक्कीम, उत्तर प्रदेशचा उत्तरी भाग, सिंधू-गंगा खोरे, बिहार आणि पश्चिम बंगाल, गुजरातचा काही भाग आणि पश्चिम किनार्याजवळील महाराष्ट्राचा काही भाग आणि राजस्थान यांचा समावेश होतो.
हैदराबाद येथील नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (NGRI) मधील भूकंपशास्त्रज्ञ डॉ. एन पूर्णचंद्र राव यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये म्हणाले होते की,"पृथ्वीच्या पृष्ठभागावर विविध प्लेट्स आहेत ज्या सतत गतीमध्ये असतात. त्या दरवर्षी ५ सें.मी. सरकतात. परिणामी हिमालयाच्या बाजूने ताण निर्माण होतो आणि मोठ्या भूकंपाची शक्यता वाढते."
हेही वाचा