भूकंपबळींची संख्या जाईल ५०,००० वर : ‘युनो’चा अंदाज

भूकंपबळींची संख्या जाईल ५०,००० वर : ‘युनो’चा अंदाज

पुढारी ऑनलाइन डेस्क : तुर्कस्‍तान आणि सीरियाला उद्‍ध्‍वस्‍त करणार्‍या  भूकंपातील बळींची संख्‍या २८,००० च्यावर गेली आहे. दोन्‍ही अख्ख्‍या जगाला हादरवून टाकणाऱ्या या भूकंपातील  बळींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. मृतांचा आकडा ५०,००० च्या घरात जावू शकतो, अशी शक्‍यता संयुक्त राष्ट्रांचे (UN – United Nations) मदत विभागाचे प्रमुख मार्टिन ग्रिफिथ यांनी वर्तविला  आहे.  भूकंपानंतर दक्षिण तुर्कीमधील अशांततेमुळे बचाव कार्यात व्यत्यय येत आहे, असंही मदत पथकाने म्‍हटले आहे. (Earthquake death)

तुर्की आणि सीरियात झालेल्या भूकंपाने तेथे मोठ्या प्रमाणात जिवित आणि वित्त हानी झाली आहे. मृतांचा आणि जखमींचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मृतांचा आकडा  २३ हजारांच्या पुढे जाऊ शकतो, असा अंदाज वर्तविला  होता. २३ हजारांचा हा आकडा पार केला आहे. आजच्या माहितीनूसार (दि.१२) हा मृतांची संख्‍या २८.००० च्या वर गेली आहे.

Earthquake death : भूकंपबळींची संख्या ५०,००० वर जातील

नुकतेच संयुक्त राष्ट्रांचे (UN – United Nations) मदत प्रमुख मार्टिन ग्रिफिथ ( Martin Griffiths) यांनी  एका वृत्तसंस्थाशी बोलताना सांगितले की, "तुर्की आणि सीरियातील भूकंपबळींचा आकडा  ५०,००० च्यावर जावू शकतो. मृतांची संख्या सध्या २८ हजारांहून अधिक आहे. ती दुप्‍पट होईल. अचूक अंदाज लावणे कठीण आहे की मृतांचा आकडा किती असेल; पण परंतु मला खात्री आहे की, हा आकडा दुप्पट किंवा अधिक होईल. आता  भूकंपातील जखमींची काळजी घेणे गरजेचे आहे."

तुर्कस्‍तानमध्‍ये २४,६१७ तर सीरियामध्ये ३,७७४ नागरिकांचा मृत्‍यू झाला आहे, असे अधिकृत घोषणा सरकारी संस्‍थांकडून करण्‍यात आली आहे. हजारो कर्मचारी ढिगाऱ्यांमध्ये वाचलेल्यांचा शोध घेण्‍यात येत आहे. 'एएफपी'च्या वृत्तानूसार संयुक्‍त राष्‍ट्रांनी यापूर्वी सांगितले होते की,  तुर्की आणि सीरियामध्ये किमान ८७०,००० लोकांना तातडीने मदतीची गरज आहे. एकट्या सीरियामध्ये ५.३ दशलक्ष लोक बेघर झाले असावेत.

तुर्कीमधील आतापर्यंतचा सर्वात विनाशकारी भूकंप

तुर्कीमध्ये आतापर्यंत बऱ्याचवेळा भूकंप झाले आहेत. आतापर्यंचे भूकंप पाहता फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेला हा भूकंप सर्वात मोठा विनाशकारी आहे. या भूकंपात आतापर्यंत २८,००० लोक मृत झाले आहेत. हा आकडा वाढण्याचा अंदाज अंदाज संयुक्त राष्ट्रांचे (UN – United Nations) मदत प्रमुख मार्टिन ग्रिफिथ यांनी  वर्तविला  आहे. यापूर्वी २७ डिसेंबर १९३९ ला तुर्कीमध्ये भूकंप झाला होता. त्याची तीव्रता ८.२ रिश्टर स्केल होती. यात तब्बल ३०,००० हून अधिक लोक मृत झाले होते.

 भारतालाही भूकंपाचा धोका

तुर्कस्तान आणि सीरियात भूकंप झाला. यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली आहे. हा भूकंप होण्यापूर्वी डच संशोधक फ्रॅंक होंगरबीटस यांनी अंदाज व्यक्त केला होता की, तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचे धक्के बसतील. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, वातावरणातील बदल पाहता  भारतालाही भूकंपाचा धोका आहे. अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप होईल आणि त्याचे धक्के पाकिस्तानसह भारतातही बसतील.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news